Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीपालकमंत्र्यांच्या आदेशाला सीईओ यांच्याकडून केराची टोपली

पालकमंत्र्यांच्या आदेशाला सीईओ यांच्याकडून केराची टोपली

स्थानिक पात्र उमेदवारांना प्राधान्य देण्याची मागणी

पालघर : पालघर जिल्हा परिषद अंतर्गत होणाऱ्या कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रियेत जिल्ह्याबाहेरील उमेदवारांना नियुक्ती न देता स्थानिक (TAIT २०२२) पात्र उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, या मागणीसाठी जनता दरबारामध्ये पालकमंत्री गणेश नाईक यांच्या सूचनेला पालघरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केराची टोपली दाखवली आहे. त्याच्या निषेधार्थ बुधवारी पालघर जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले. पालघर जिल्हा प्रशासन स्थानिक उमेदवारांना सहकार्य करीत नसून त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांना यावेळी लक्ष केले होते.

पालघर जिल्हा परिषदेकडून २८ फेब्रुवारी २०२५ रोजी परिपत्रक प्रसारित करण्यात आले असून या मानधन तत्वावरील कंत्राटी शिक्षक पदभरती प्रक्रियेत जिल्ह्याबाहेरील उमेदवारांना तसेच TAIT २०२२ परीक्षा न दिलेल्या उमेदवारांना त्यांचे समुपदेशन देऊन नियुक्ती देण्यात येऊ नये, त्या जागी स्थानिक TAIT २०२२ पात्र उमेदवारांना संधी देऊन नियुक्ती देण्यात यावी, असे म्हटले आहे.

होळीसाठी गावी जायचंय? मध्य रेल्वे चालवणार ३४ अनारक्षित होळी विशेष ट्रेन

२० फेब्रुवारी २०२५ रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबार येथे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना दिलेल्या निवेदनाचे निराकरण झाले नाही मात्र पालघर जिल्हा पालकमंत्री यांच्याकडून योग्य मार्गदर्शन सुचना येईपर्यंत ही भरती प्रक्रिया स्थगित करावी. अन्यथा आम्ही TAIT २०२२ पात्र उमेदवार पालघर यांच्याकडून जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचे पालघर जिल्हा परिषदेसमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू राहील.

जर आमच्या उमेदवारांमधील उष्माघाताने, भूकबळीने जीव गमवावा लागला तर त्यास सर्वस्वी जबाबदार पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी राहतील, असा इशारा कृष्णा बबन भोये, मगन रामता भोये, नवशा शंकर नारले यांच्यासह शेकडो बेरोजगार शिक्षकांनी दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -