नाशिक : राज्याचे कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माणिक कोकाटे यांना न्यायालयाने सुनावणी पूर्ण होईपर्यंत दिलेल्या शिक्षेसाठी स्थगिती दिली आहे.राज्याचे कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माणिक कोकाटे यांनी सर्वसाधारण तीस वर्षांपूर्वी खोटी कागदपत्र बनवून मुख्यमंत्री कोट्यातील निवासस्थान मिळविले होते याबाबतही तक्रार माजी मंत्री आणि सिन्नरचे माजी आमदार तुकाराम दिघोळे यांनी केली होती त्यानंतर याबाबतचा तपास पूर्ण झाला आणि सर्व साधारण पंधरा दिवसांपूर्वी अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाने माणिक कोकाटे व त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना दोन वर्ष शिक्षा आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती या शिक्षेच्या विरोधामध्ये कृषी मंत्री माणिक कोकाटे यांच्या वतीने जेष्ठविधी तज्ञ जयंत जायभावे यांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अपील केलेले होते.
Amravati Fire : मेळघाटातील चाकर्दा येथे भीषण आग; संपूर्ण वस्ती जळून खाक, अनेक कुटुंब उघड्यावर
आज बुधवारी राज्याचे कृषिमंत्री माणिक कोकाटे यांनी केलेल्या अपिलावरती न्यायमूर्ती जीवने यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली या सुनावणी मध्ये माणिक कोकाटे यांना अपील पूर्ण होईपर्यंत शिक्षेसाठी स्थगिती दिलेली असून न्यायालयाने या अपीला सोबत इतर जास्त याचीका दाखल झालेले होत्या त्या मात्र तीन याचिका रद्द केलेल्या आहेत . कृषिमंत्री माणिक कोकाटे यांच्या बाबतीत सुरू असलेली सुनावणी ही यापुढे नाशिकच्या न्यायालयात होणार असल्याचे एडवोकेट जयंत जायभाये यांनी सांगितले