अमरावती : धारणी तालुक्यातील नागढाना येथील नवी वस्ती चाकर्दा येथे मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास भीषण आगीची दुर्घटना घडली. या अचानक लागलेल्या आगीत एका रांगेत असलेल्या ७ पेक्षा जास्त घरे पूर्णतः जळून खाक झाले आहे. तर अन्य २ घरांचेही मोठे नुकसान झाले आहे.
नागढाना येथील चाकर्दा परिसरात लागलेली आग एवढी भयावह होती की काही क्षणातच संपूर्ण वस्तीने पेट घेतला अनेक नागरिक घरात नसल्याने जीवितहानी टळली असली तरी त्यांचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला आहे. या भीषण आगीत घरातील दुचाकी, गॅस सिलेंडर, कपाटातील दागिने, कपडे, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य आणि शेतातून आणलेली तूरही भस्मसात झाली.
Cyber Crime : सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ!
सततच्या कष्टाने उभारलेली घरे एका रात्रीत संपून गेली, त्यामुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहे. स्थानीय प्रशासन आणि गृहनिर्माण विभागाने त्वरित मदत जाहीर करावी अशी नागरिकांची मागणी आहे.या आगीमुळे सर्वत्र गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.अग्निशमन विभागाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली असली तरी मात्र आदिवासी कुटूंबाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.