Saturday, May 10, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

CCTV : मुंबईतील नालेसफाईच्या कामांवर ‘तिसरा’ डोळा ठेवणार नजर

CCTV : मुंबईतील नालेसफाईच्या कामांवर ‘तिसरा’ डोळा ठेवणार नजर

प्रत्येक नालेसफाईच्या कामांच्या ठिकाणी बसवणार कॅमेरा


नालेसफाईच्या कामांमध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न


मुंबई : मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्प कामांचा आढावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेत नालेसफाईच्या कामांमध्ये एआय टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र, बृहमुंबई महानगरपालिकेच्यावतीने येत्या मार्च ते एप्रिलपासून सुरु होणाऱ्या नालेसफाईच्या कामांमध्ये सीसी टिव्ही कॅमेरांचा वापर होणार असून प्रत्येक मोठ्या आणि छोट्या नाल्यांच्या ठिकाणी सीसी टिव्ही कॅमेरे बसवले जाणार आहे. या कॅमेरांच्या माध्यमांतून नालेसफाईच्या कामांवर महापालिका प्रशासन नियंत्रण तसेच देखरेख ठेवली जाणार आहे.


मुंबईतील मोठ्या आणि छोट्या नाल्यांसह मिठी नदीच्या सफाईसाठी बृहमुंबई महानगरपालिकेच्यावतीने सध्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या नालेसफाईच्या कामांसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया अंतिम होवून पुढील दोन वर्षांसाठी सुमारे ५०० कोटी रुपयांच्या कामांसाठी कंत्राटदारांची निवड केली जाणार आहे. मात्र, आजवर नालेसफाईच्या कामांबाबत घोटाळ्याचे आरोप वारंवार होत असून या कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक नाल्यांच्या ठिकाणी सीसी टिव्ही बसवण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरु आहे. मात्र, प्रत्येक वेळी नालेसफाईच्या कामाच्या ठिकाणी सीसी टिव्ही बसवण्यास टाळाटाळ केली जात होती. परंतु आगामी नालेसफाईच्या कामांच्या ठिकाणी आता सीसी टिव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक नाल्यांच्या ठिकाणी कंत्राटदाराच्या माध्यमातून सीसी टिव्ही कॅमेरे बसवले जाणार असून या कॅमेरांच्या माध्यमातून कामांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.



एआय टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचे निर्देश


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नालेसफाईच्या कामांमध्ये एआय टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचे निर्देश दिले असून प्रशासनाने या कामांमध्ये कंत्राटदारांना सीसी टिव्ही कॅमेरे बसवण्याची सक्ती केल्याने एकप्रकारे या कामांमध्ये पारदर्शकता राहिल आणि प्रत्येक अर्धा तासाने याची व्हिडीओ सेव केले जातील असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी प्रत्येक दिवशी केलेल्या कामांचे व्हिडीओ अपलोड केले जायचे, पंरतु आता प्रत्यक्ष काम सुरु असताना बृहमुंबई महानगरपालिकेतून अधिकाऱ्यांना तसेच कंत्राटदारांसह सामान्य जनतेलाही पाहता येणार आहे,असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment