Terrorists Attack : पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यात १२ ठार, ३० जखमी

- सहा दहशतवाद्यांचा खात्मा - दहशतवादी संघटनेने स्वीकारली जबाबदारी


लाहोर : पाकिस्तानातील लाहोर इथे होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी या क्रिकेट स्पर्धेतील दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंडच्या संघांतील उपांत्य सामन्यापूर्वी पाकिस्तानच बॉम्ब हल्ल्यांनी हादरला आहे. येथील खैबर पख्तूनख्वा प्रांतात दोन बॉम्बस्फोट झालेत. हा दहशतवादी हल्ला असल्याचं वृत्त आहे. या घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला तर ३० जण ठार झाले.


मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला मंगळवारी रात्री उशिरा झाला.हल्लेखोरांनी बन्नू तळाच्या प्रवेशद्वारातून स्फोटकांनी भरलेल्या दोन कार आत आणल्या आणि त्यांची टक्कर घडवून आणली. ज्यामुळं हे स्फोट झाले. या आत्मघातली हल्ल्यात तीन लहान मुलांसह १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३० हून अधिक लोक जखमी झाले आहे. यानंतर १२ दहशतवाद्यांनी इफ्तारनंतर बन्नू केंट या ठिकाणी असलेल्या सुरक्षा कड्यावर हल्ला केला. या हल्ल्याचं उत्तर देताना लष्करानं तहरीक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेच्या ६ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचं वृत्तही समोर आलं आहे.



एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की दहशतवाद्यांनी जे स्फोट घडवून आणले ते स्फोट इतक्या भीषण स्वरुपाचे होते की, ४-४ फुटांच्या अंतरावर रस्त्यात दोन मोठे खड्डे तयार झाले. तर ८ घरं उद्ध्वस्त झाली. मशिदीतील छप्परही एका क्षणात कोसळलं. या हल्ल्याची जबाबदारी हाफिज गुल बहादूर याच्या नेतृत्त्वातील दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे. रमजानचा उपवास सोडत असतानाच हा हल्ला झाला त्यामुळे एकच खळबळ उडाली. या ठिकाणी आक्रोश आणि किंकाळ्या ऐकू येत होत्या. तसंच धुराचे आणि धुळीचे लोटही मोठ्या प्रमाणावर उठले होते.या घटनेमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण आहे.


दरम्यान, पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी या भ्याड हल्ल्याची निंदा केली आहे.त्यांनी म्हटलं आहे की, रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. या दरम्यान उपवास सोडणाऱ्या नागरिकांवर भ्याड हल्ला करण्यात आला. या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही निषेध नोंदवतो. जे लोक ठार झाले त्यामध्ये तीन लहान मुलं दोन महिला यांचाही समावेश आहे. दरम्यान सुरक्षा दलांची आणि दहशतवाद्यांची चकमक झाली त्या चकमकीत ५ ते ६ दहशतवादी ठार झाले अशीही माहिती समोर आली आहे.

Comments
Add Comment

कोनेरू हम्पीची सुरक्षेच्या कारणास्तव कॅन्डिडेट्स स्पर्धेतून माघार

नवी दिल्ली : भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी या महिन्यात सायप्रसमध्ये होणाऱ्या प्रतिष्ठित कॅन्डिडेट्स

चोरट्यांनी बँक लुटली, रोख १३.७ लाख रुपये आणि २.१ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने चोरले

पेशावर : पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांताची राजधानी असलेल्या पेशावरमध्ये कोहाट रोडवरील नॅशनल बँकेच्या

होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर इराणकडून २० लाख डॉलर्स शुल्क

तेहरान : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेले संकट अधिक तीव्र होत असल्याचे दिसत आहे. आता इराणने जागतिक तेल पुरवठ्यासाठी

पश्चिम आशियातील युद्धामुळे पाकिस्तान भिकेला; एका रात्रीत इंधनाचे भाव २०० रुपयांनी वाढले

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान सरकारने आता हाय-ऑक्टेन इंधनावरील करात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला

Iran-US-Israel War : "अमेरिकेने ऊर्जा केंद्रांवर हल्ला केल्यास..."; अमेरिकेच्या धमकीला इराणचे स्पष्ट उत्तर

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव आता अत्यंत गंभीर टप्प्यावर पोहोचला आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू

Plane - Fire Truck Accident : थेट विमानानेच दिली अग्निशमन दलाच्या गाडीला धडक, अनेक जण जखमी

न्यूयॉर्कच्या ला गार्डिया विमानतळ (LaGuardia Airport) येथे सोमवारी (२३ मार्च) एक धक्कादायक अपघात घडला. लँडिंगदरम्यान एका