मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojna) योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ८ मार्च रोजी थेट लाभार्थींच्या खात्यात जमा केला जाईल. मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मार्च अखेरीस देण्यात येणार असल्याची स्पष्टीकरण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोमवारी विधान भवनात पत्रकारांशी बोलताना दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, ‘लाडकी बहीण’ योजना योजना बंद होणार नाही.