Wednesday, March 26, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSuresh Dhas Reaction After Dhananjay Munde Resignation : धनंजय मुंडेंचा राजीनामा; सुरेश...

Suresh Dhas Reaction After Dhananjay Munde Resignation : धनंजय मुंडेंचा राजीनामा; सुरेश धसांचा पुढचा प्लॅन काय?

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतरही लढाई सुरूच रहाणार – सुरेश धस

परळी : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) प्रकरणी मोठ्या दबावाखाली धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यासाठी त्यांनी वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे. या प्रकरणावरून सुरेश धस (Suresh Dhas) यांनी पुढील लढाईचा इशारा दिला आहे. (Suresh Dhas Reaction After Dhananjay Munde Resignation)

वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देत असल्याची सोशल मिडिया पोस्ट धनंजय मुंडेंनी केली आहे. यानंतर आता सुरेश धस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पुढे काय प्लॅन आहे, याबद्दल सांगितलं आहे.

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा

सुरेश धस यांची प्रतिक्रिया

राजीनामा म्हणजे पूर्णविराम नसून, लढाई आणखी तीव्र होईल, असे सुरेश धस यांनी स्पष्ट केले. त्यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांचे आभार मानत, दोन आठवड्यांपूर्वीच अजित पवारांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याचा सल्ला दिला होता, असे सांगितले. तसेच, आता या प्रकरणाच्या तपासात कोणताही दबाव राहणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

सुरेश धस यांनी पुढील तपासाबाबतही वक्तव्य केले:

सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल झाल्यानंतर आणखी कारवाई होईल.

तपासासाठी कॉल रेकॉर्डिंग आणि काही अधिकाऱ्यांची चौकशी होणे आवश्यक आहे.

हा लढा थांबणार नाही, दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे.

परळीतील नागरिकांना दिलासा

परळीमध्ये या प्रकरणामुळे मोठ्या प्रमाणात तणाव होता. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर परळीतील लोक सुटकेचा निश्वास सोडतील, असे सुरेश धस म्हणाले. आता मोठ्या आकाच्या मागे कोणताही राजकीय आधार उरला नसल्याने, अनेकजण पुढे येऊन तक्रारी करतील, असा दावा त्यांनी केला.

लढाई कायम राहणार

सुरेश धस यांनी सांगितले की, राजीनामा हा शेवट नाही, राष्ट्रपतींकडे माफीनामा गेला तरी लढाई सुरूच राहील. दोषींना फाशी होईपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून न्याय मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -