Thursday, March 20, 2025
Homeब्रेकिंग न्यूजDhananjay Munde : धनंजय मुंडेंनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा

मुंबई : मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटो हाती लागल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे.

Girls Birth Rate : मुलींचा घटणारा जन्मदर चिंता वाढविणारा

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे बोलले जाते. मुंडे यांच्या निवडणुकीचे व्यवस्थापन वाल्मिक कराडकडे होते, असा दावा केला जातो. राजकीय अभय, वरदहस्त असल्याने कराडने बीडमध्ये गुन्हे केले आणि पचवले असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. वाल्मिक कराड आरोपी असल्याने या प्रकरणी तपास योग्य रीतीने होणार नाही, असेही विरोधकांनी म्हणत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी आपल्यावरील आरोपांबाबत स्पष्टीकरण दिले. धनंजय मुंडे हे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा देतील असा दावा त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी केला होता. मात्र, मुंडेंनी राजीनामा न दिल्याने त्यांचा दावा फोल ठरला होता. त्यानंतर करूणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असून तो दोन तीन दिवसांत जाहीर केला जाईल, असा नवा दावा केला होता.

अखेर आज मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सोपवला आहे. दरम्यान यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे. मुंडे यांचा राजीनामा मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. त्यांना मंत्रिपदाच्या कार्यभारातून मुक्त केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले दरम्यान धनंजय मुंडेंनंतर राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रिपदावर कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -