Saturday, May 24, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

MSME : भारताच्या आर्थिक विकासात एमएसएमईंची महत्त्वपूर्ण भूमिका – पंतप्रधान मोदी

MSME : भारताच्या आर्थिक विकासात एमएसएमईंची महत्त्वपूर्ण भूमिका – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : भारताच्या आर्थिक प्रगतीत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई-MSME) परिवर्तनकारी भूमिका बजावत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी स्पष्ट केले.


"वाढ, उत्पादन, निर्यात आणि अणुऊर्जेचे इंजिन" या विषयावरील वेबिनारला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत सरकार स्वावलंबी भारताच्या दृष्टीकोनातून काम करत आहे आणि सुधारणा आणण्याचा वेग वाढवत आहे. आज देशात ६ कोटींहून अधिक एमएसएमई कार्यरत असून, यामुळे कोट्यवधी लोकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत.



एमएसएमईंसाठी व्यापक योजना


पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, "यंदाच्या अर्थसंकल्पात एमएसएमईंची व्याख्या अधिक व्यापक करण्यात आली आहे, जेणेकरून या क्षेत्रातील उद्योगांना अधिक संधी आणि आत्मविश्वास मिळेल. परिणामी, तरुणांसाठी रोजगाराच्या संधी वाढतील."



मोदी यांनी नमूद केले की, उत्पादन-संबंधित प्रोत्साहन (PLI) योजनेचा १४ उद्योगांना लाभ झाला असून, आतापर्यंत ७५० हून अधिक युनिट्स मंजूर करण्यात आल्या आहेत. यामुळे १.५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक, १३ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पादन, आणि ५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निर्यात झाली आहे.



आर्थिक सुधारणांचा वेग आणि पारदर्शकता


ते पुढे म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत भारताने आर्थिक सुधारणा, पारदर्शकता, आणि समावेशक विकास यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. सरकार उद्योगांसाठी सोयीस्कर आर्थिक वातावरण निर्माण करत आहे आणि एमएसएमईंना वित्तीय मदत सहज मिळावी यासाठी नव्या पद्धती शोधत आहे.


"५ लाख नवोदित महिला उद्योजक, अनुसूचित जाती आणि जमातीतील उद्योजकांना २ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल," असे त्यांनी सांगितले.



भारतीय उत्पादकांना संधी


मोदींनी असेही सांगितले की, कोविडच्या आर्थिक परिणामांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात भारत यशस्वी ठरला असून, त्यामुळे देश जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनला आहे.


आज जगभरातील देश भारतासोबत आर्थिक भागीदारी मजबूत करू इच्छित आहेत. त्यामुळे भारतीय उद्योजक आणि उत्पादकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Comments
Add Comment