Thursday, March 27, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणGirls Birth Rate : मुलींचा घटणारा जन्मदर चिंता वाढविणारा

Girls Birth Rate : मुलींचा घटणारा जन्मदर चिंता वाढविणारा

रत्नागिरी : मागील पाच वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात ३४ हजार ३२ मुलगे आणि ३२ हजार १२६ मुली असे मिळून ६६ हजार १५८ मुलांचा जन्म झाला आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर (Girls Birth Rate) हा कमी होत आहे. पाच वर्षांपूर्वी हजार मुलांमागे ९५७ मुली जन्मल्या होत्या. तर २०२४-२५ या वर्षात हजार मुलांमागे ९४४ मुलीं जन्मल्याचे दिसते. घटणारी आकडेवारी चिंता वाढवणारी ठरणार असून मुलींचा जन्मदर स्थिर राखण्याचे आव्हान राहणार आहे.

Bihar Buddhgaya : महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी

वंशाला दिवा पाहिजे म्हणून मुलगा हवा, अशी अनेक वर्षापूर्वीची मानसिकता कुटुंबांमध्ये पाहायला मिळत होती. या मानसिकतेत बदल करण्यासाठी शासनाने ‘बेटी बचाओ’सारखे उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. शासन-प्रशासन, सामाजिक संस्था यांच्याकडून लोकांमध्ये जनजागृतीही केली जात आहे. मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी अशा प्रचलित म्हणीवरून स्त्रीजन्माचे महत्त्वही विशद केले जात आहे; मात्र गेल्या पाच वर्षात मुलींचा जन्मदर कमी-अधिक राहत असल्याचे दिसत आहे. पूर्वी एका कुटुंबामध्ये अनेक मुले जन्माला येत होती. शासनाने संतती नियोजनाच्या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. समाजात झालेले बदल, शिक्षणाचा वाढलेला टक्का, बदलते राहणीमान आदींमुळे कुटुंबे सुशिक्षित झाली आहेत.

समाज जडणघडणीत वंशाचा दिवा हवाच ही मानसिकता कमी झालेली आहे. कायद्याद्वारे लिंगनिदान, स्त्री भ्रूणहत्या करण्यास शासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी शासनातर्फे माझी भाग्य योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना यांसारख्या योजनाही राबवल्या जात आहेत. मात्र दरवर्षी जन्माला येणाऱ्या मुलांच्या आकडेवारीचा विचार करता मुलांच्या तुलनेमध्ये मुलींचा जन्मदर कमी होत आहे. २०२०-२१ मध्ये ८ हजार ४५ मुले तर ७ हजार ७०३ मुली जन्माला आल्या. त्यावर्षी जन्मदर ९५७ होता तर २०२३-२४ मध्ये जन्मदर ९१८ आणि २०२४-२५ मध्ये जन्मदर ९४२ राहिलेला आहे. त्यामुळे काही अंशाने जन्मदर कमी होत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -