नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ती मागील वर्षी अर्थसंकल्पामध्ये नाशिकला नियो मेट्रो प्रकल्प सुरू करायला निधी निश्चित केला होता परंतु आता मेट्रो प्रकल्प येता येता शहरात कॉम्पॅक्ट मेट्रो धावणार आहे. सध्या अशी सेवा तैवान येथील ताईपाई येथे सुरू आहे. या मेट्रोसाठी रेल्वे मंत्रालयाचे अधिकारी नाशिकला दाखल झाले असून पुढच्या आठवड्यापासून प्रत्यक्ष पाहणी सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता ही मेट्रो तरी नाशिककरांना मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
कॉम्पॅक्ट मेट्रोच्या मार्गात एकूण सुमारे ४० स्थानके असतील. तसेच कॉम्पॅक्ट मेट्रो शहरातील सर्व महत्वाच्या भागांना जोडेल कॉम्पॅक्ट मेट्रो १२ टन वाजन राहणार आहे. या मेट्रोची २.६५ मिटर रुंदी तर २० मिटर लांबी असेल व कॉम्पॅक्ट मेट्रो पूर्ण वातानुकूलित असणार आहे.
Germany Car Attack : जर्मनीत कार चालकाने लोकांना चिरडले; दोघांचा मृत्यू, अनेक जखमी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या
आधी हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याने स्थानिक पातळीवरुन आता आराखडा कधी जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात नाशिकच्या निओ मेट्रो प्रकल्पाची घोषणा देखील करण्यात आली होती, मात्र आता ती कॉम्पॅक्ट मेट्रो रुपाने नाशिकला मिळणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी
यांनी देखील नाशिकमध्ये मेट्रो प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यांत पूर्ण होईल आणि यासाठी १,६०० कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आलेली होती, मात्र आता खर्चात देखील वाढ होणार असल्याचे समजते. नाशिक शहरात कॉम्पॅक्ट मेट्रो सुरू झाल्यास नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला नवी दिशा मिळेल. सुमारे २५ लाखांच्या घरात नाशिकची लोकसंख्या पोहोचली असून सततच्या वाहतूक कोंडीमुळे शहरवासीय त्रस्त झालेले आहे. त्यामुळे नाशिकला लवकरात लवकर रेल्वेची घोषणेप्रमाणे नियो मेट्रो सुविधा मिळावी, यासाठी प्रयत्न सुरु आहे. मात्र आता मेट्रो निओ प्रकल्प देशातील पहिला रबर-टायर्ड मेट्रो प्रणाली प्रकल्प होता, मात्र त्या जागी आता कॉम्पॅक्ट मेट्रो नाशिकला मिळणार आहे.
दरम्यान जुन्या मार्गात काही बदल होणार असून काही नवीन मार्ग देखील कॉम्पॅक्ट मेट्रो प्रकल्पात सामील होणार आहे. राज्याचे मुख्य सचिवांसह रेल्वेचे अधिकाऱ्यांची व्हिडियो मिटींग झाली.त्यात नाशिकचे विभागीय महसुल आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, मनपा आयुक्त मनिषा खत्री, अतिरीक्त आयुक्त प्रदिप चौधरी, वाहतूक सेलचे प्रमुख राजेंद्र बागुल आदी अधिकारी सामील झाले होते. नाशिक शहरात लवकरच कॉम्पॅक्ट मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी होणार आहे. यासाठी नव्याने आराखडा पाठविण्याचे आदेश शासनाने दिले आहे. कॉम्पॅक्ट मेट्रो प्रकल्पामुळे नाशिकची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सुलभआणि गतिमान होणार आहे.