मुख्यमंत्र्यांनी घेतला मुंबई महापालिकेच्या २ लाख कोटींच्या प्रकल्पांचा आढावा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत विधान भवन, मुंबई येथे आज मुंबई महानगरपालिकेच्या पायाभूत प्रकल्पांसंदर्भात आढावा बैठक पार पडली. बैठकीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या सुमारे १ लाख ४१ हजार कोटींच्या तसेच प्रस्तावित २५ हजार कोटींच्या विविध पायाभूत व इतर सुविधा प्रकल्पांसंदर्भात तसेच महापालिकेच्या वतीने करण्यात येणार्‍या नाले सफाईच्या कामांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (एआय) वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनाला दिले.


धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गाचे काम जवळपास पूर्ण होत आले असून या मार्गाच्या परिसरात हाजी अली येथे १२०० वाहन क्षमतेचे वाहन तळ उभारण्यात यावे, सध्या सुरू असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी वेगाने कामे मार्गी लावावीत, प्रस्तावित प्रकल्पांसाठीची टेंडर कामे महिन्याभरात पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महापालिका आयुक्त यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे विविध प्रकल्पांच्या सद्यःस्थितीची माहिती दिली.



बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव व संबंधित विभागाचे महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.



मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पांसाठी दिले निर्देश


- सुमारे ७०० किमी रस्त्यांचे काँक्रिटीकरण
- वर्सोवा ते भाईंदर सागरी किनारी मार्ग
- गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसह गोखले पूल, विक्रोळी पूल, कर्नाक पूल, सायन पूल, बेलासिस पूल, महालक्ष्मी पूल, मढ-वर्सोवा पूल आदी पुलांची कामे
- दहीसर, पोईसर, ओशिवरा नदी पुनर्जीविकरण व मिठी नदी स्वच्छता प्रकल्प
- वर्सोवा, मालाड, भांडुप, घाटकोपर येथील मलजल उदचन केंद्र
- वर्सोवा मलजल बोगदा, मिठी नदी पॅकेज मलजल बोगदा व प्राधान्य मलजल बोगदा
- सायन केईएम, सायन व नायर रुग्णालयांचे पुनर्विकास व नवीन रुग्णालयांची उभारणी
- दहिसर पश्चिम द्रुतगती मार्गावरील ऑक्ट्रॉय नाका व मानखुर्द येथे वाहनतळ व व्यावसायिक केंद्र उभारणी
- निःक्षारीकरण प्रकल्प, मिठी नदी पॅकेज ५, पांजरापोळ जलशुद्धीकरण प्रकल्प, दहिसर उद्यान विकास, मानखुर्द वाहतूक केंद्र, जिजामाता उद्यान विस्तारीकरण व मुलुंड पक्षी संग्रहालय, देवनार बायोमायनिंग, देवनार पशुवध आधुनिकीकरण, मध्यवर्ती उद्यान पायाभूत सुविधा व गारगाई पाणी पुरवठा प्रकल्प हे सुमारे २५ हजार कोटींचे प्रकल्प

Comments
Add Comment

समुद्रात जाणे टाळा ! हवामान विभागाचा मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा

मुंबई : राज्यातील सागरकिनाऱ्यावरील सर्व मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा: मुंबई आणि कोकणात जोरदार पावसाचा इशारा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार,

कांदिवलीत उंच इमारतीला आग; आठ जणांना वाचवले

मुंबई : रविवारी सकाळी कांदिवली (पश्चिम) येथील अग्रवाल रेसिडेन्सी या उंच इमारतीत लागलेल्या आगीने परिसरात खळबळ

MPSC 2026 चे वेळापत्रक जाहीर, सविस्तर वाचा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, गुंदवलीवरून थेट गाठता येणार मिरा रोड

मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या गुंदवलीवरून निघालेली मेट्रो दहिसर पूर्व

देशामध्ये २२ बनावट विद्यापीठे

‘यूजीसी’ने जाहीर केली यादी मुंबई  : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व