मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भारतीय जनता पार्टी(BJP) विजय मिळवेल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे(BJP) प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी व्यक्त केला. ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने मंगळवारी श्री. बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यावेळी श्री. बावनकुळे बोलत होते.
ब्रह्मपुरी विधानसभेतील गौरव अशोक भैय्याजी, नगर परिषद माजी गटनेते विलास विखार, माजी नगर परिषद उपाध्यक्ष डॉ. सतीश कावळे, पंचायत समितीचे माजी सभापती नामदेव लांजेवार, सुरेश दर्वे यांसह अनेकांचे श्री. बावनकुळे यांनी पक्षात स्वागत केले. यावेळी प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.
चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी श्री. बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला साथ देण्यासाठी ह्या सर्वांनी भारतीय जनता पार्टी(BJP) मध्ये प्रवेश केला आहे.समाजातील शेवटच्या घटकाचे कल्याण हे लक्ष्य ठेवून भाजपा कार्य करत आहे. भाजपा नेतृत्व आणि कार्यावर विश्वास ठेवूनच मागच्या 50 वर्षांपासून काँग्रेसशी जोडलेल्या भैय्याजी कुटुंबातील अशोक भैय्याजी यांचे पुत्र गौरव, श्री. विखार, विजय वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक श्री.कावळे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या सर्वांचा यथोचित सन्मान राखला जाईल. नव्याने प्रवेश केलेल्या सर्वांनी भाजपा सदस्य नोंदणी अभियानात सामील व्हावे, प्रमुख नेत्यांना सक्रीय सदस्य बनवावे, भाजपा संघटना वाढीचे काम करावे असे आवाहन श्री बावनकुळे यांनी केले. पक्ष संघटना तुमच्या सदैव पाठीशी राहील असे आश्वासनही त्यांनी दिले.
भाजपा मध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये सुखदेव खेने, स्वप्नील सावरकर, मोहन वैद्य, बन्सीलाल कुर्जेकार, निलेश चिंचुरकर आदींचा समावेश आहे.
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…