Thursday, March 20, 2025
Homeताज्या घडामोडीChura Ke Dil Mera : 'चुरा के दिल मेरा' या गाण्यावर अक्षय...

Chura Ke Dil Mera : ‘चुरा के दिल मेरा’ या गाण्यावर अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी थिरकले

मुंबई : मुंबईत आयोजित एका इव्हेंटमध्ये अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांची जोडी पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळाली आहे. दोघांची जोडी 30 वर्षानंतर एकत्र पाहायला मिळाली. यानंतर दोघेही एकत्र एकाच स्टेजवर परफॉर्म करताना दिसले. सध्या दोघांचाही व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मुंबईत आयोजित एका इव्हेंटमध्ये काही कलाकार पोहोचले होते. यावेळी शिल्पा आणि अक्षयही त्याच ठिकाणी आले होते. सर्वजण व्हाईट आऊटफिटमध्ये होते. शिल्पा पांढऱ्या नेट साडीत खूप सुंदर दिसत होती. तर अक्षयही व्हाईट सूट बूटमध्ये डॅशिंग दिसत होता. दोघंही स्टेजवर असताना त्यांनी ‘चुरा के दिल मेरा..’ या त्यांच्या गाण्यावर डान्स केला. दोघांनीही तीच स्टेप करत गाणं रिक्रिएट केलं. या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.

Germany Car Attack : जर्मनीत कार चालकाने लोकांना चिरडले; दोघांचा मृत्यू, अनेक जखमी

दरम्यान, अक्षय आणि शिल्पाचं अफेअर खूप चर्चेत आले होते. शिल्पाने मुलाखतींमध्ये अक्षयवरचं प्रेमही व्यक्त केलं होतं. मात्र नंतर अक्षयने तिचा विश्वासघात केला. यानंतर शिल्पा पूर्णत: खचली होती. त्यानंतर २००१ साली अक्षयने ट्विंकल खन्नासोबत लग्न केलं. तर २००९ साली शिल्पा राज कुंद्रासोबत लग्नबंधनात अडकली. बऱ्याच वर्षानंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळाल्यानंतर चाहत्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -