अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरुन विरोधकांचा सरकारवर साधला निशाणा
मुंबई : विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीपासून विरोधक आक्रमक झाले आहेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे हातात बेड्या घालून विधानभवनात दाखल झाले. त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून सरकारवर निशाणा साधला.
विधानपरिषदेत कामकाजाच्या सुरूवातीलाच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिक्षा झालेल्या मंत्र्यांचा मुद्दा उपस्थित केला. शोकप्रस्तावाच्या आधीच त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यावरुन विरोधकांनी गोंधळ घातला. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सांगितले, संबंधित सदस्य हे खालच्या सभागृतील सदस्य आहेत. त्यामुळे त्यावर नंतरही बोलता येईल. मात्र, विरोधकांचे त्यावर समाधान झाले नाही. एका मंत्र्याला शिक्षा झालेली आहे. त्यावर सरकारचे म्हणणे काय, यावर सरकारची मागणी काय, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. त्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.
Eknath Shinde : अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची एकनाथ शिंदेंची मागणी
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासोबतच विधान परिषदेचे माजी सदस्य डॉ. घनश्याम दुबे, नारायण वैद्य आणि सुभाष चव्हाण यांच्या निधनावर सभागृहानं शोक व्यक्त केला. त्यानंतर परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. राज्यपालांच्या अभिभाषणावर मंगळवार आणि बुधवारी चर्चा करण्यात येणार आहे.