मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ यावेळेस आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये धमाल करत आहे. संघाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. टीम इंडियाने ग्रुप स्टेजमध्ये आपले तीनही सामने जिंकत सेमीफायनलमध्ये शानदार प्रवेश केला आहे.
आता भारतीय संघ आपला पहिला सेमीफायनल सामना ४ मार्चला दुबईत खेळणार आहे. हा सामना ग्रुप बीमध्ये दुसऱ्या स्थानावरील ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध असेल. भारतीय संघाने ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना रविवार २ मार्चला खेळला होता. या सामन्यात भारतीय संघाने ४४ धावांनी जिंकला.
या सामन्यात भारताचे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहितने एक मास्टर स्ट्रोक खेळला. हा मास्टर स्ट्रोक म्हणजे लेग स्पिनर वरूण चक्रवर्तीला खेळवणे. यासाठी त्यांना वेगवान गोलंदाज हर्षित राणाला बाहेर बसवावे लागले. ही जोखीम मोठी होती कारण हे संघावर उलट पडले असते.
वरूणशिवाय प्लेईंग ११ मध्ये ३ स्पिनर आणखी आहे. हे स्पिनर म्हणजे रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल.मात्र गंभीरचा हा मास्टरस्ट्रोक यशस्वी ठरला. वरूण चक्रवर्तीने लेग स्पिनचा असा चक्रव्यूह बनवला की संपूर्ण न्यूझीलंडचा संघ यात अडकला.
आता सेमीफायनलआधी टेन्शनमध्ये टीम इंडिया
वरूण चक्रवर्तीने या सामन्यात १० विकेट गोलंदाजी केली. यात त्याने ४२ धावा देत ५ विकेट घेतल्या. त्याने विल यंग, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रासवेल, मिचेल सँटनर आणि मॅट हेन्री यांनी बाद केले.