
पुणे: मेट्रो प्रशासनाने तिकीटविरहित आणि सवलतीमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांसाठी ’एक पुणे मेट्रो कार्ड’ची सुविधा उपलब्ध केली आहे. हे कार्ड प्रवाशांकडे असल्यास प्रवाशांना तिकीट काढण्याची आवश्यकता भासत नाही. या कार्डमध्ये करण्यात आलेल्या रिचार्जमधून प्रवास करताना ठराविक अंतरापर्यंतचे तिकिटाचे भाडेसुध्दा आपोआप कट होते. महत्त्वाचे म्हणजे हे कार्ड असल्यास प्रवाशांना मेट्रोच्या तिकिटासाठी तिकीट खिडक्यांवर रांगेत थांबावे लागत नाही. हे कार्ड इतरवेळी ११८ रुपयांना मिळते.

रत्नागिरी : मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६ हजार ९९१ जणांना लाभ झाला असून त्यांच्या खात्यात प्रत्येकी ३ हजार रुपये वर्ग करण्यात आले ...
मात्र, जागतिक महिला दिनानिमित्त मेट्रोकडून हे कार्ड फक्त महिलांसाठी अवघ्या २० रुपयांना मिळणार आहे. मेट्रोकडून जागतिक महिला दिनानिमित्त ही भेट महिलांना देण्यात आली आहे. याचा लाभ महिलांनी घ्यावा, असे आवाहन मेट्रोकडून करण्यात आले आहे.