रत्नागिरी : मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६ हजार ९९१ जणांना लाभ झाला असून त्यांच्या खात्यात प्रत्येकी ३ हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत, अशी माहिती समाजकल्याण सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी दिली.
श्री. घाटे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, वर्षे वय ६५ आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साह्य, साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनःस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना लागू करण्यात आली आहे.
Lawyer Black Coat : काळा कोट न घालता वकिलांना चार महिने करता येणार काम
जिल्ह्तून या योजनेसाठी एकूण २१ हजार ८२ पात्र अर्ज प्राप्त झाले आहेत. शासनाकडून ६ हजार ९९१ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी तीन हजाराची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. उर्वरित १४ हजार ९१ लाभार्थ्यांनाही लवकरच हा लाभ देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. लाभ दिलेल्या लाभार्थ्याच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे रक्कम जमा झाल्यानंतर आधार लिंक असण्याऱ्या मोबाइल क्रमांकांवर अर्जदास बँकेमार्फत एसएमएसद्वारे संदेश पाठविला जातो. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांनी कळविले आहे.