मुंबई: चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सेमीफायनल सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मंगळवारी खेळवला जाईल. या सामन्याच्या पूर्वसंध्येला टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान, दुबईत टीम इंडियाला मिळत असलेल्या फायद्यांवर त्याला सवाल करण्यात आला. याचे सडेतोड उत्तर रोहितने यावेळी दिले.
टीम इंडिया या स्पर्धेतूील सर्व सामने दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळत आहे. इतकंच की टीम इंडिया जर फायनलमध्ये पोहोचली तर तो सामनाही याच मैदानावर होईल.
चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तान भूषवत आहे. दरम्यान, बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले होते ते सुरक्षेच्या कारणास्तव आपला संघ पाकिस्तानला पाठवू शकणार नाहीत. त्यामुळेच भारत सर्व सामने दुबईत खेळेल. यजमान पाकिस्तानला भारताविरुद्ध ग्रुप स्टेजचे सामने खेळण्यासाठी दुबईत यावे लागले. यावरून अनेकांनी सवालही उपस्थित केले आहेत. त्यांच्यानुसार इतर संघ विविध मैदानांवर खेळत आहे मात्र भारत केवळ एकाच मैदानावर खेळत आहे.
यावरून रोहितला पत्रकार परिषदेत सवाल करण्यात आले. यावर रोहितने सडेतोड उत्तर दिले. आम्हाला नाही माहीत की या पिचवर काय होणार आहे. सेमीफायनलमध्ये कोणत्या पिचचा वापर करतील हे आम्हाला माहीत नाही मात्र जे असेल त्यानुसार खेळ करावा लागेल. तसेच हे आमचे घर नाही ही दुबई आहे. आम्ही येथे खूप सामने खेळत नाही आमच्यासाठीही हे नवीन आहे.
रोहित शर्मा पुढे म्हणाला, आमच्या संघाने येथे ३ सामने खेळलेत त्या सर्व सामन्यांमध्ये पिच वेगवेगळी होती. न्यूझीलंडविरुद्ध आम्ही पाहिले की, जेव्हा त्यांचे वेगवान गोलंदाजांनी बॉलला स्विंग आणि सीम केले. गेल्या दोन सामन्यांत आमच्या गोलंदाजांनी पहिल्यांदा गोलंदाजी केली मात्र तेव्हा असे पाहिले नव्हते. संध्याकाळच्या वेळेस वातावरण थोडे थंड असते. यामुळे बॉल स्विंग होण्याची शक्यता असते.