जयपूर : महाकुंभात चर्चेत आलेला ‘आयआयटी बाबा’ उर्फ अभय सिंह याला जयपूर पोलिसांनी अटक (IIT BABA Arrested) केली आहे. सोशल मीडियावर जीव देण्याची धमकी दिल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. जयपूरमधील रिद्धी-सिद्धी परिसरातील एका हॉटेलमधून त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याजवळ गांजा (ड्रग्ज) सापडल्याची माहिती समोर आली आहे.
एनडीपीएस अंतर्गत कारवाईची शक्यता
IIT BABA Arrested : पोलिसांनी ‘आयआयटी बाबा’विरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची शक्यता वर्तवली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी न्यूजरूममध्ये भगवे कपडे घातलेल्या काही लोकांनी गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. हे प्रकरण ताजे असतानाच, आता पोलिसांनी त्याच्यावर ही कारवाई केली आहे.
Supriya Sule : अत्याचाराच्या घटनांवर खासदार सुप्रिया सुळे यांचा संताप; आरोपींना भरचौकात फाशी द्या
अटकेनंतर ‘आयआयटी बाबा’ची प्रतिक्रिया
IIT BABA Arrested : अटक झाल्यानंतर ‘आयआयटी बाबा’ म्हणाला, “माझ्याजवळ थोडासा प्रसाद (गांजा) सापडला आहे. कोणीतरी अफवा पसरवली की बाबा आत्महत्या करणार आहेत. पोलीस एका विचित्र कारणावरून माझ्याजवळ आले. मी त्यांना सांगितले की, जर या प्रसादावर गुन्हा दाखल करायचा असेल, तर कुंभमेळ्यात हजारो लोक याचा वापर करतात— मग त्यांनाही अटक करा.”