E-KYC Mandatory : रेशनकार्ड धारकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; ३० मार्चपर्यंत मुदतवाढ


धाराशिव : राज्य सरकारने सार्वजनिक वितरण प्रणालीतील सर्व रेशनकार्डधारकांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य केली आहे. ई-केवायसी न केल्यास शिधा वितरण बंद होण्याची शक्यता आहे. याआधी अंतिम मुदत २८ फेब्रुवारी होती. मात्र, नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन ३० मार्चपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.


ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नागरिकांना रेशन दुकानातील ई-पॉस मशिनवर अंगठा स्कॅन करावा लागत होता. मात्र, सर्व्हर डाऊन होण्याच्या तक्रारी आणि अनेक शिधापत्रिकाधारक बाहेरगावी असल्याने अडचणी येत होत्या. या समस्येवर उपाय म्हणून केंद्र सरकारने "Mera e-KYC Mobile App" आणि "Aadhar Face RD Service App" हे मोबाईल अॅप्स सुरू केले आहे.



ई-केवायसी करण्याची पद्धत पुढीलप्रमाणे आहे. Google Play Store वरून "Mera e-KYC Mobile App" आणि "Aadhar Face RD Service App" डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे.


Mera e-KYC Mobile App उघडून राज्य आणि ठिकाण निवडावे. आधार क्रमांक टाकून आलेला OTP संबंधित रकान्यात भरावा.सर्व माहिती भरून सबमिट बटणावर क्लिक करावे. Face e-KYC पर्यायावर क्लिक करून सेल्फी कॅमेरा सुरू करावा.डोळ्यांची उघडझाप करून फोटो काढावा. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर "e-KYC पूर्ण" झाल्याचा संदेश मिळेल.


जिल्हा प्रशासनाने सर्व रेशनकार्डधारकांनी ३० मार्चपूर्वी ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच मोबाईल अॅपच्या माध्यमातून घरी बसूनही ही प्रक्रिया पूर्ण करता येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांनी कळविले आहे.

Comments
Add Comment

Special Bus Service : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा; महाड-माणगाव-पोलादपूरसाठी विशेष बससेवा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे.

Mumbai - Pune Missing Link : मुंबई - पुणे मिसिंग लिंक बंद राहणार, काय आहे कारण ? जाणून घ्या सविस्तर

मुंबई : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंकचा मुंबई - पुणे मार्ग दुरुस्तीचे काम आणि मॉक ड्रिल या

Mangal Prabhat Lodha : '‘ड्रग्स फ्री मुंबई’चा संदेश गणेशोत्सवातून द्यावा; गणेश मंडळांनी समाजप्रबोधनावर भर द्यावा'

मुंबई : मलबार हिल विधानसभा क्षेत्रातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी यंदाच्या गणेशोत्सवातील देखावे व सजावट ‘ड्रग्स

Tejasvi Ghosalkar : मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी ३ राखीव डबे हवेत; भाजप नेत्या तेजस्वी घोसाळकर यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

Mumbai : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवासात विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय आणि वाढती गर्दी लक्षात घेता, एक मोठा

Chandrakant Patil : 'राज्यातील विद्यापीठांनी एकसमान शैक्षणिक वेळापत्रक राबवावे'

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्व सार्वजनिक विद्यापीठांनी

Mumbra Railway Accident : मुंब्रा रेल्वे पुलाजवळ लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट

मुंबई : मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावर (Mumbai Local Train) मंगळवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. चालत्या लोकलमधून पडल्याने 27