Sunday, March 16, 2025
Homeताज्या घडामोडीE-KYC Mandatory : रेशनकार्ड धारकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; ३० मार्चपर्यंत मुदतवाढ

E-KYC Mandatory : रेशनकार्ड धारकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; ३० मार्चपर्यंत मुदतवाढ

धाराशिव : राज्य सरकारने सार्वजनिक वितरण प्रणालीतील सर्व रेशनकार्डधारकांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य केली आहे. ई-केवायसी न केल्यास शिधा वितरण बंद होण्याची शक्यता आहे. याआधी अंतिम मुदत २८ फेब्रुवारी होती. मात्र, नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन ३० मार्चपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नागरिकांना रेशन दुकानातील ई-पॉस मशिनवर अंगठा स्कॅन करावा लागत होता. मात्र, सर्व्हर डाऊन होण्याच्या तक्रारी आणि अनेक शिधापत्रिकाधारक बाहेरगावी असल्याने अडचणी येत होत्या. या समस्येवर उपाय म्हणून केंद्र सरकारने “Mera e-KYC Mobile App” आणि “Aadhar Face RD Service App” हे मोबाईल अॅप्स सुरू केले आहे.

Madhavi Puri Buch FIR : सेबीच्या माजी अध्यक्षांविरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश

ई-केवायसी करण्याची पद्धत पुढीलप्रमाणे आहे. Google Play Store वरून “Mera e-KYC Mobile App” आणि “Aadhar Face RD Service App” डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे.

Mera e-KYC Mobile App उघडून राज्य आणि ठिकाण निवडावे. आधार क्रमांक टाकून आलेला OTP संबंधित रकान्यात भरावा.सर्व माहिती भरून सबमिट बटणावर क्लिक करावे. Face e-KYC पर्यायावर क्लिक करून सेल्फी कॅमेरा सुरू करावा.डोळ्यांची उघडझाप करून फोटो काढावा. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर “e-KYC पूर्ण” झाल्याचा संदेश मिळेल.

जिल्हा प्रशासनाने सर्व रेशनकार्डधारकांनी ३० मार्चपूर्वी ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच मोबाईल अॅपच्या माध्यमातून घरी बसूनही ही प्रक्रिया पूर्ण करता येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांनी कळविले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -