मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) जीवनावर आधारित ‘छावा’ (Chaava) हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात संभाजीराजेंचे शौर्य दाखवण्यात आले आहे. तसेच औरंगजेबाने (Aurangzeb) संभाजीराजेंना कसं छळलं, हेही दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाचे प्रेक्षकांकडून कौतुक होत असतानाच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी मात्र धक्कादायक विधान केले आहे. (Abu Azmi on Chhatrapati Sambhaji Maharaj) औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, अशी मुक्ताफळं आझमींनी उधळली आहेत. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात धर्माची लढाई नव्हती, असेही ते म्हणाले. यामुळे आता नविन वादाला तोंड फुटले आहे.
कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मुद्यावर काय म्हणाले मुख्यमंत्री ?
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले. सपा नेते अबू आझमी यांनीही अधिवेशनाला हजेरी लावली. या वेळी सभागृहाबाहेर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान आणि ब्रह्मदेशापर्यंत होती. त्या काळात आपला जो जीडीपी होती, तो २४ टक्के होता. भारताला ‘सोने की चिडीया म्हटलं जायचचं. या सगळ्या गोष्टींना मी चुकीचं म्हणू का, असा सवाल आझमींनी केला.
अबू आझमी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई ही सत्तेसाठी होती. ही लढाई धर्मासाठी होती.. हे जर कोणी बोलत असेल तर ते मी मानत नाही, असेही आझमी यांनी म्हटले.