राहाता : हात चालाकी करून एटीएम कार्ड बदलणाऱ्या मध्यप्रदेश येथील मूळ रहिवासी असलेल्या ३५ वर्षीय तरुणास राहाता पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याकडील असलेले विविध बँकेचे एकूण ७० एटीएम हस्तगत केले आहे.
याबाबत माहिती अशी की राहाता येथील भारतीय स्टेट बँकेसमोर असलेल्या एटीएम मशीन जवळ रविवारी सायंकाळी ६ वाजे दरम्यान एक अनोळखी इसम एटीएम जवळ गिरट्या मारत असल्याचा फोन राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांना आला पोलीस उपनिरीक्षक यांनी तात्काळ पोलीस कॉन्स्टेबल झिने यांना बरोबर घेऊन स्टेट बँकेच्या एटीएम कडे धाव घेत त्या ठिकाणी एटीएम च्या बाहेर फिरत असलेल्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्या अंगाची झडती घेतली असता त्याच्याजवळ विविध बँकेचे एकूण ७० एटीएम व दोन फेविक्विक ट्यूब हस्तगत केल्या असून त्याने त्याचे नाव दीपक राजेंद्र सोनी वय वर्ष ३५ राहणार वॉर्ड नंबर ११,गोवर्धन टाकी जवळ,छत्रपूर, मध्य प्रदेश असे सांगितले आहे.
Ram Mandir : राम मंदिरावरील हल्ल्याचा कट उधळला, फरीदाबाद येथून दहशतवादी अब्दुल रहमानला अटक
काही महिन्यापूर्वी नांदुरखी येथील एका व्यक्तीचे एटीएम मधून हात चाले की करत पैसे गेले होते. पोलिसांनी रविवारी पकडलेला व्यक्ती तोच असून याच व्यक्तीने माझ्याकडे असलेले एटीएम घेऊन मला हात चालाकी करत फसवले असल्याचे त्यांनी सांगितले.पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी या घटनेबाबत फोन आल्यावर लगेचच तत्परता दाखवल्यामुळे हात चालाकी करून एटीएम कार्डची आदलाबदल करत अनेकांचे पैसे लुबाडणाऱ्या या व्यक्तीला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक शिंदे व पोलीस कॉन्स्टेबल झिने यांचे कौतुक केले जात आहे.
या घटनेनंतर पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांनी राहाता पोलीस ठाण्यात भेट देऊन त्या आरोपीची माहिती घेतली पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन चव्हाण हे या गुन्हचा तपास करीत आहे.या आरोपीला न्यायालयात हजर केले असता राहाता न्यायालयाने आरोपीला चार दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.