Sunday, March 16, 2025
HomeदेशRam Mandir : राम मंदिरावरील हल्ल्याचा कट उधळला, फरीदाबाद येथून दहशतवादी अब्दुल...

Ram Mandir : राम मंदिरावरील हल्ल्याचा कट उधळला, फरीदाबाद येथून दहशतवादी अब्दुल रहमानला अटक

गुजरात आणि फरीदाबाद एसटीफची संयुक्त कारवाई

नवी दिल्ली : अयोध्येच्या श्रीराम मंदिरावरील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावण्यात आलाय. याप्रकरणी गुजरात व फरीदाबाद एटीएसने रविवारी अब्दुल रहमान नामक दहशतवाद्याला अटक केली होती. चौकशीत त्याने राम मंदिरावरील हल्ल्याच्या योजनेचा खुलासा केलाय. विशेष म्हणजे अब्दुलकडून 2 हँण्ड ग्रेनेड देखील जप्त केले आहेत.

यासंदर्भात चौकशीत पुढे आलेल्या माहितीनुसार, जिहादी दहशतवादी अब्दुल रहमान फरीदाबादचा रहिवासी असून तो व्यवसायाने मांस विक्रेता (कसाई) आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने अब्दुलला प्रशिक्षण दिले होते. तसेच त्याला हल्ल्यासाठी 2 हँण्ड ग्रेनेड देण्यात आले होते. हे बॉम्ब घेऊन अब्दुल रहमान अयोध्येला जाणार होता. त्याने हे दोन्ही बॉम्ब एका पडक्या घरात लपवून ठेवले होते. या पडक्या घरातून काही व्हिडीओ सापडले असून त्यात देशातील प्रमुख धार्मिक स्थळांची माहिती आहे.

अयोध्येच्या मिल्कीपूरचा रहिवासी असलेला रेहमान हा शंकराच्या नावाने फरीदाबादच्या पाली येथे लपून बसला होता. तो येथे एका कूपनलिकेच्या चेंबरमध्ये राहत होता, ज्याच्या मालकाचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. कुठलाही घातपात घडवण्यापूर्वी अब्दलला झालेली अटक हे गुजरात एटीएसचे हे मोठे यश म्हणून पाहिले जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -