विदर्भाने सात वर्षात तिसऱ्यांदा जिंकली रणजी ट्रॉफी

नागपूर : विदर्भाने सात वर्षात तिसऱ्यांदा रणजी ट्रॉफी जिंकली. यंदा रणजी ट्रॉफी २०२४ - २५ चा अंतिम सामना विदर्भ आणि केरळ यांच्यात झाला. करुण नायरने दोन्ही डावात छान फलंदाजी केली. त्याने दुसऱ्या डावात शतक झळकावले. यामुळे विदर्भाने अंतिम सामन्यात केरळचा सहज पराभव केला.विदर्भाने याआधी २०१७ - १८ आणि २०१८ - १९ मध्ये रणजी ट्रॉफी जिंकली. विशेष म्हणजे २०२४ - २५ च्या हंगामात रणजी ट्रॉफीमध्ये विदर्भ संघाने एकही सामना गमावलेला नाही.

रणजी ट्रॉफी २०२४ - २५ च्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणे केरळला भोवले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या विदर्भाने पहिल्या डावात सर्वबाद ३७९ आणि दुसऱ्या डावात ९ बाद ३७५ धावा केल्या. तर केरळने पहिल्या डावात सर्वबाद ३४२ धावा केल्या. टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलेल्या करुण नायरने विदर्भाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. करुणने पहिल्या डावात ८६ आणि दुसऱ्या डावात १३५ धावा केल्या. सामनावीर झालेल्या विदर्भच्या दानिशने पहिल्या डावात १५३ आणि दुसऱ्या डावात ७३ धावा केल्या. विदर्भचाच हर्ष दुबे मालिकावीर झाला. नियमानुसार पाच दिवसांचा खेळ संपल्यानंतर सामना अनिर्णित जाहीर करण्यात आला.

रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना अनिर्णित राहिला, तर पहिल्या डावाच्या आधारे जास्त धावा करणाऱ्या संघाला विजेता घोषित केले जाते. विदर्भ विरुद्ध केरळ अंतिम सामन्यात, विदर्भाने पहिल्या डावात ३७९ धावा केल्या होत्या. केरळने पहिल्या डावात ३४२ धावा केल्या होत्या. पहिल्या डावाच्या आधारे विदर्भाने ३७ धावांची आघाडी घेतली होती.

यंदाच्या रणजीच्या हंगामात विदर्भ संघाने सर्वोत्तम कामगिरी केली, त्यांनी एकही सामना गमावलेला नाही. यंदाच्या हंगामात विदर्भ संघ आठ सामने खेळला. यातील सात सामन्यांत त्यांचा विजय झाला आणि एक सामना अनिर्णित राहिला. याउलट केरळ संघ सात पैकी तीन सामने जिंकला. पण त्यांचे चार सामने अनिर्णित राहिले.
Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत