मुंबई : मुंबईच्या पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गांवर शनिवारी रात्रीपासून तर रविवारी सकाळपर्यंत ब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर ग्रँट रोड ते मुंबईसेंट्रल दरम्यान पूल क्रमांक पाचच्या कामासाठी १३ तासांचा ब्लॉक असणार आहे. तर मध्य रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या काही कामांमुळे १० तासांचा ब्लॉक असणार आहे. यामुळे अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.
Delhi News : जुन्या वाहनांना दिल्लीत पेट्रोल, डिझेल मिळणार नाही
ग्रॅण्ट रोड स्थानकाजवळ गर्डर उभारणीच्या कामामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर बदल करण्यात आला आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यानच्या जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावरून चालवल्या जातील. तसेच, चर्चगेट लोकल वांद्रे आणि दादर येथेच थांबतील. काही लोकल गाड्या वांद्रे आणि दादरहून विरार आणि बोरिवलीच्या दिशेने सोडण्यात येतील.
मध्य रेल्वेवरही १० तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाट क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणासाठी तसेच प्री नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोडदरम्यान लोकलसेवा बंद राहणार आहेत. या कालावधीत ५९ लोकल आणि ३ मेल-एक्स्प्रेस देखील रद्द राहणार आहेत. ४७ एक्स्प्रेसवर परिणाम होणार- काही
गाड्या दादर स्थानकावर थांबवण्यात येणार आहेत.