डोंबिवली : मध्ये रेल्वेतील (Central Railway) सर्वात जास्त गर्दीचे डोंबिवली (Dombivali) रेल्वे स्थानक आहे. वाढत्या गर्दीवर रेल्वे प्रवाशाकरता रेल्वे गाडी वाढविण्यात आल्या असल्या तरी गर्दीत वाढ होत असताना दिसते. यावर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश मोरे यांनी लक्ष देत पालिका आयुक्तांची भेट घेऊन डोंबिवली ते ठाणे बससेवा सुरु करणाबाबत चर्चा केली. पालिका आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेत बससेवा सुरु करण्याचे आश्वासन दिले.
Mumbai Crime : पाळण्याच्या दोरीने गळा आवळत जन्मदात्यानेच घेतला ४ महिन्यांच्या मुलीचा जीव!
याबाबत आमदार मोरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, डोंबिवलीकरांना ठाणे शहरात जाण्याकरता रेल्वेच्या गर्दीतून जाण्यावची गरज भासणार नाही.डोंबिवली पश्चिमेकडील शास्त्रीनगर रुग्णालयजवळ ते ठाणे आणि दोन टाकी ते ठाणेशहर असा परिवहन बससेवा सुरु होणार आहे.आपल्या मागणीचा विचार करून बससेवा सुरु करणार असल्याने पालिका आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांच आभार मानतो. डोंबिवली ते ठाणे अशी बससेवा सुरु होणार असल्याने आता ठाणे शहरापर्यतचा प्रवास सुखकर होणार आहे. तिकीट दराबाबत अद्याप निश्चित झाले नाही.
अपघातावर नियंत्रण येणार
सकाळवेळी डोंबिवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते.डोंबिवली ते ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे गाडीतून पडून अनेक अपघात झाले. मात्र आता डोंबिवली ते ठाणे परिवहन बससेवा सुरु होणार असल्याने डोंबिवली, कोपर, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान प्रवाशांची संख्या काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. या स्थानकादरम्यान रेल्वे अपघातांवर नियंत्रण येईल असे डोंबिवलीकर म्हणत आहे.