जुन्नर : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता. अलिबाग जि. रायगड यांच्या वतीने नारायणगाव ग्रामपंचायत परिसरामध्ये स्वच्छता अभियानाचे (cleanliness drive) आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे स्वच्छतादूत पद्मश्री महाराष्ट्रभूषण डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगडभूषण डॉ. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या स्वच्छता अभियानाच्या आयोजन करण्यात आले होते. आपला परिसर स्वच्छ राहावा तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता यावी या उद्देशाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
Dombivali : डोंबिवलीकरांसाठी खुशखबर! डोंबिवली ते ठाणे बससेवा सुरु होणार
सकाळी ८ वाजून ३० मिनिटपासून प्रतिष्ठानच्या सदस्यांनी नारायणगाव परिसरातील जुना पुणे नाशिक महामार्ग, पोलीस स्टेशन, कोल्हे मळा ते बस स्थानक, ओझर रोड ते पुनम हॉटेल रोड, नेवकर पुल, खोडद रस्ता अशा एकूण सहा हजार चौरस मीटर जागेचे तसेच २१ किलोमीटर दुतर्फा रस्त्यांची स्वच्छता केली. यावेळी साधारणपणे तीन टन ओला कचरा व १३ टन सुका कचरा जमा करण्यात आला. ग्रामपंचायत मार्फत पुरवण्यात आलेल्या व प्रतिष्ठानच्या सदस्यांनी आणलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून हा कचरा कचरा डेपोपर्यंत नेऊन त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
या स्वच्छता अभियानाच्याप्रसंगी जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, उपसरपंच बाबु पाटे, पोलीस उपनिरिक्षक जगदिश पाटील, नारायणगांव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे, तसेच नारायणगाव परिसरातील नागरिक उपस्थित होते.