Wednesday, March 26, 2025
Homeब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र भूषण पुरस्कार देणार कधी?

महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणार कधी?

२०२५ चे २ महिने झाले, अद्याप महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४ घोषित नाही

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना महाराष्ट्र शासनाची माहिती

मुंबई : महाराष्ट्र शासनाने अद्याप सन २०२४चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) घोषित केलेला नाही, अशी माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागविलेल्या माहितीच्या उत्तरातून स्पष्ट झाली आहे.

अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे कार्यक्रम अधिकारी नि. ज्ञा. धुमाळ यांनी सांगितले की, सन २०२३ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार २२ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदान करण्यात आला होता. तसेच, २०२४ च्या पुरस्कारासाठी २ जानेवारी २०२४ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.

ट्रम्प आणि झेलेंस्की यांच्यात शा‍ब्दिक चकमक, युक्रेनच्या अडचणीत वाढ

१९९७ पासून २०२३ या कालावधीत एकूण १९ महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. मात्र, सन २०२१, २०१३, २०१४, २०१६, २०१७, २०१८, २०१९ आणि २०२० या वर्षांत हा पुरस्कार देण्यात आलेला नाही.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्य शासनाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, त्यामुळे शासनाने त्वरित २०२४ चा पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणी अनिल गलगली यांनी केली आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त मान्यवर

१९९७ साली पु. ल. देशपांडे (साहित्य), १९९८ साली लता मंगेशकर (संगीत), १९९९ साली सुनील गावसकर (क्रीडा), २००० साली डॉ. विजय भटकर (विज्ञान ), २००१ साली सचिन तेंडूलकर (क्रीडा), २००२ साली पं. भीमसेन जोशी (कला/संगीत ), २००३ साली डॉ. अभय बंग व राणी बंग (समाज प्रबोधन), २००४ साली बाबा आमटे (समाज प्रबोधन), २००५ साली डॉ. रघुनाथ माशेलकर (विज्ञान), २००६ साली रतन टाटा (उद्योग), २००७ साली रा. कृ. पाटील (समाजप्रबोधन), २००८ साली मंगेश पाडगावकर (साहित्य), २००८ साली नानासाहेब धर्माधिकारी (समाज प्रबोधन), २००९ साली सुलोचना लाटकर (मराठी चित्रपट), २०१० साली जयंत नारळीकर (विज्ञान), २०११ साली अनिल काकोडकर (विज्ञान), २०१५ साली बाबासाहेब पुरंदरे (साहित्य), २०२१ साली आशा भोसले (संगीत), २०२२ साली डॉ. दत्तात्रेय नारायण उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी (समाज प्रबोधन), २०२३ साली अशोक सराफ (मराठी चित्रपट) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -