दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत साखळी सामन्याच्या निमित्ताने भारत आणि न्यूझीलंड रविवार २ मार्च रोजी दुबईत आमनेसामने असतील. भारतीय वेळेनुसार रविवारी दुपारी अडीच वाजल्यापासून सामन्याचे थेट प्रक्षेपण सुरू होणार आहे. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे होणार असलेल्या या सामन्याच्या निमित्ताने विराट कोहलीला न्यूझीलंड विरुद्ध खेळताना सचिनचा विक्रम मोडण्याची संधी आहे.
न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर आहे. या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानी आहे. सचिन तेंडुलकरने न्यूझीलंड विरुद्ध ४२ एकदिवसीय सामने खेळून ४६.०५ च्या सरासरीने १७५० धावा केल्या आहेत. यात पाच शतके आणि आठ अर्धशतकांचा समावेश आहे.
AUS vs AFG: पावसामुळे ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान सामना रद्द, ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये
विराट कोहलीने न्यूझीलंड विरुद्ध ३१ एकदिवसीय सामने खेळून ५८.७५ च्या सरासरीने १६४५ धावा केल्या आहेत. यात सहा शतके आणि नऊ अर्धशतकांचा समावेश आहे. कोहलीला सचिनचा विक्रम मोडण्यासाठी आणखी १०५ धावांची आवश्यकता आहे.
न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
- सचिन तेंडुलकर – ४२ एकदिवसीय सामने – सरासरी ४६.०५ – १७५० धावा (निवृत्त)
- विराट कोहली – ३१ एकदिवसीय सामने – सरासरी ५८.७५ – १६४५ धावा (खेळतोय)
- विरेंद्र सेहवाग – २३ एकदिवसीय सामने – सरासरी ५२.५९ – ११५७ धावा (निवृत्त)