Saturday, March 22, 2025
Homeक्रीडाIND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा 'रेस्ट फॉर्म्युला'

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा ‘रेस्ट फॉर्म्युला’

मुंबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने शानदार कामगिरी केली आहे. भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध ६ विकेटनी विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानला ६ विकेटनी हरवले. सलग दोन विजय मिळवत भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. भारतीय संघ आपला सेमीफायनलचा सामना ४ मार्चला दुबईत खेळणार आहे. दरम्यान, त्यांचा सामना कोणाशी असेल हे रविवार २ मार्चला ठरेल.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रोहित बाहेर?

२ मार्चला भारतीय संघ दुबईत आपला शेवटचा साखळी सामना खेळत आहे. सेमीफायनलच्या आधी हा सामना भारतीय संघासाठी सरावापेक्षा कमी नसेल. या सामन्यात भारतीय संघात बदल पाहायला मिळू शकतो.

मिडिया रिपोर्टनुसार, शुभमन गिल न्यूझीलंडविरुद्ध नेतृत्व करू शकतो. तर रोहित शर्माला विश्रांती दिली जाऊ शकते. रोहितला पाकिस्तानविरुद्ध सामन्यात दुखापतीचा त्रास जाणवला होता. अशातच रोहित सेमीफायनलच्या आधी थोडा आराम करताना दिसेल.

शुभमन गिल बुधवारी सरावासाठी आला नव्हता. दरम्यान, गुरूवारी तो नेट्सवर परतला आणि नेट्समध्ये त्याने बराच वेळ सराव केला. जर रोहित शर्माला न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात आराम दिला तर ऋषभ पंत अथवा वॉशिंग्टन सुंदरला प्लेईंग ११मध्ये सामील केले जाऊ शकते.ऋषभला इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -