Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीMatheran Rop way : माथेरानच्या रोपवे प्रकल्पास हिरवा कंदील!

Matheran Rop way : माथेरानच्या रोपवे प्रकल्पास हिरवा कंदील!

माथेरान : नेरळ माथेरान एकमेव मार्ग असल्याने पर्यायी व्यवस्था उपलब्ध व्हावी ही स्थानिकांची अनेक वर्षापासूनची मागणी होती त्यातच रोपवेचा प्रस्तावित प्रकल्पाला राज्य शासनाकडून नुकताच हिरवा कंदील मिळाल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. केंद्राच्या राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि.( एनएचएलएमएल ) आणि राज्य सरकारकडून पर्वतमाला परीयोजनेअंतर्गत एकूण ४५ रोपवे ची कामे हाती घेण्यात आली आहेत. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्याला मान्यताही देण्यात आली आहे.

सरकारकडून १६ तर एनएचएलएमएल कडून २९ रोपवेची उभारणी करण्यात येणार आहे. यातील कोकण विभागात ११ तर पुणे विभागात १९ रोपवे असतील रोपवेची उभारणी करताना विविध पर्यायांचा वापर करण्यात येणार असून त्यात एनएचएलएमएल ला जागा उपलब्ध करून देणे आणि त्यात समभाग घेऊन महसूल मिळवणे राज्य सरकार कडून खाजगी सार्वजनिक प्रकल्पाच्या आधारावर उभारणी करणे आणि बांधा, वापरा हस्तांतरित करा या मार्गांचा अवलंब करण्यात येणार आहे.

ट्रम्प आणि झेलेंस्की यांच्यात शा‍ब्दिक चकमक, युक्रेनच्या अडचणीत वाढ

कोकण विभागातील माथेरानचा प्रस्तावित रोपवे प्रकल्प एमएमआरडीएच्या माध्यमातून पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होऊन पर्यटन वाढीसाठी केंद्रबिंदू ठरणार असल्याने या रोपवे ची कामे युद्धपातळीवर मार्गी लावावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -