नाशिक : शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यामुळे एका युवकाने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यू हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की सध्या शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती उलाढाल सुरू आहे शेअर बाजार हा दिवसेंदिवस खाली उतरत आहे त्यामुळे नाशिक शहरात राहत असलेला आणि मूळचा नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एका छोट्याशा गावामध्ये राहत असलेला राजेंद्र शिवाजी कोल्हे या ३० वर्षीय युवकाने शेअर बाजारामध्ये सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले.
नाशिकमध्ये नोकरी करून आई-वडिलांना पैसे न देता ते शेअर बाजारामध्ये अडकविले वेळप्रसंगी आपल्या मित्र मंडळा कडून पैसे घेऊन ते शेअर बाजारामध्ये अडकविले परंतु शेअर बाजारामध्ये दिवसेंदिवस नुकसान होत गेल्याने हा युवक हतबल झाला होता अखेर या युवकाने महाशिवरात्रीच्या दिवशी त्रंबकेश्वर येथे जाऊन त्रंबकेश्वर चे दर्शन घेतले आणि येताना पिंपळगाव बहुला या ठिकाणी असलेल्या एका मोकळ्या जागेमध्ये आपली दुचाकी घेऊन जाऊन ती सर्वप्रथम पेटवली आणि अंगावरती पेट्रोल ओतून स्वतःला जाळून घेतले पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले आणि त्यांनी जिल्हा रुग्णालयामध्ये राजेंद्र कोल्हे याला दाखल केले परंतु उपचार सुरू असताना त्याचे शनिवारी निधन झाले. त्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.