Share

सौंदर्य तुझं- प्राची शिरकर

सणावाराच्या विशेष प्रसंगी महिला मोठ्या प्रमाणावर साड्यांची खरेदी करतात. कारण आपल्या भारतीय महिलांचा वॉर्डरोब साडीशिवाय अपूर्ण मानला जातो. प्रत्येक खास प्रसंगासाठी परफेक्ट साडी नक्कीच सापडते. एरवी बऱ्याच जणी ड्रेस, जीन्स अशा कपड्यांमध्ये वावरतात. पण लग्न किंवा इतर कोणताही कार्यक्रम असला की हमखास साड्यांची खरेदी केली जाते आणि आवर्जून साड्याच नेसल्या जातात. आता अगदी जवळचं लग्न असेल तर मग त्या लग्नांमध्ये तर काठपदराच्या प्युअर सिल्क साड्या नेसण्यालाच जास्त प्राधान्य दिलं जातं. जसं की पैठणी, शालू, बनारसी साडी, पटोला, बांधणी इत्यादी. यापैकीच एक सर्वात प्रसिद्ध असणारा प्रकार म्हणजे कांचीपुरम, कांजीवरम आणि कांची पट्टू साड्या. या साड्यांचा लुक एकदम रॉयल दिसतो. अशातच ‘कांजीवरम’ या साडीचा मोठ्या प्रमाणात ट्रेंड सुरू आहे. अगदी चापूनचोपून बसणारी ही कांजीवरम साडी अनेक महिलांचं आकर्षण ठरली आहे. खरी कांजीवरम साडी ओळखायची असेल तर त्याची एक वेगळीच चमक दिसते. कांजीवरम साडी आकर्षक रंग, चमक आणि त्यावर करण्यात आलेल्या कामामुळे ती ओळखली जाते. कांजीवरम साड्यांची परंपरा ही शतकानुशतके जुनी आहे, ज्याचा समृद्ध वारसा हजारो वर्षांपूर्वीचा आहे. तामिळनाडूच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक पद्धतींमध्ये खोलवर या साड्या रुजल्या आहेत. या साड्या शुद्ध तुतीच्या रेशमापासून काळजीपूर्वक विणल्या जातात. या सिल्क साड्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जरीचा वापर. सोने किंवा चांदीपासून बनवलेले धागे यामुळे या साड्या अधिक मौल्यवान असतात. अनेक पारंपरिक तसेच विवाह सोहळ्यांकरता या साड्या वापरण्याकडे अनेक महिलांचा कल असतो. मात्र, कांजीवरम आणि कांचीपुरम या साड्यांमध्ये नेमका फरक काय हा प्रश्न अनेक महिलांना पडलेला असतो. आजच्या या लेखातून जाणून घेऊयात कांजीवरम आणि कांचीपुरम या साडीतील नेमका फरक काय आणि या साडीची खास ओळख कशी या विषयी.

कांजीवरम साडीची विशेषता :

कांचीपुरम ही साडी हाताने विणली जाते. या साड्या मलबेरी सिल्कपासून तयार होतात, साडीचा हा सिल्क अत्यंत उच्च दर्जाचा असतो. कांजीवरम साड्यांवर सोन्याची किंवा चांदीची जरी केलेली असते. या साड्या वाइब्रंट रंगांमध्ये येतात आणि त्यांच्या टिकाऊपणासाठी प्रसिद्ध आहेत. साडीवर केलेले हातकाम खूप सुंदर दिसते. हातमागावरती बनवलेल्या या कांजीवरमचा नंबर भारतातील सर्वात महागड्या साड्यांमध्ये लागतो. या साडीचे विशेष आकर्षण ठरते तिचे मोठे आणि कॉन्ट्रास्ट काठ. कांजीवरमला २००५ पासून “भौगोलिक स्थानदर्शक” प्रमाणपत्र देऊन संरक्षण देण्यात आले आहे. या साड्या लग्नसमारंभ, सण-उत्सव अशा खास प्रसंगी नेसल्या जातात.

विणकाम :

कांजीवरम ही हातमागावर बनवली जाते. ही साडी शुद्ध लाल रेशमी धाग्यापासून बनवली जाते. ही साडी विणण्यासाठी अति तलम रेशमाचा वापर केला जातो. उभे आणि आडवे दोन्ही धागे दुहेरी वापरतात. चंद्र, सूर्य, रथ, मोर, पोपट, राजहंस, सिंह, नानी, आंबे, पाने, गोल किंवा चौकोनामध्ये जाई-जुईची कळी या प्रकारची नक्षीकामे या साडीमध्ये केली जातात. एक साडी बनविण्यासाठी १५ दिवस ते १ महिना इतका वेळ लागतो. साडीवरील नक्षीकामावरून तिचा विणण्याचा कालावधी ठरतो. कांचीपुरम शहराला रेशीम शहर म्हणून ओळखले जाते कारण त्याची बहुतेक लोकसंख्या रेशीम उद्योगावर अवलंबून आहे. विणकर उजव्या बाजूला काम करतो, तर त्याचा सहाय्यक डाव्या बाजूला शटल काम करतो. बॉर्डरचा रंग आणि डिझाईन सहसा बॉडीपेक्षा बरेच वेगळे असते. खऱ्या कांचीपुरम सिल्क साडीमध्ये, बॉडी आणि बॉर्डर वेगळे विणले जातात आणि नंतर एकमेकांशी जोडले जातात. जोड इतका मजबूत विणलेला असतो की साडी फाटली तरी बॉर्डर वेगळे होणार नाही. प्रामाणिक कांचीपुरम सिल्क साडीमध्ये, साडी आणि पल्लूचा मुख्य भाग स्वतंत्रपणे विणला जातो आणि नंतर एकत्र शिवला जातो.

डिझाईन :

साड्या त्यांच्या विस्तृत कॉन्ट्रास्ट बॉर्डर्समुळे ओळखल्या जातात. कांचीपुरम साड्यांच्या पारंपरिक डिझाईनमध्ये साध्या सोन्याच्या रेषा किंवा सोन्याचे ठिपके दर्शविणारे डिझाईन तयार होते. या साड्यांवरील डिझाईन दक्षिण भारतीय मंदिरांमधील डिझाईन किंवा पक्षी, पाने इत्यादी नैसर्गिक घटकांपासून प्रेरित होते. मंदिराच्या बॉर्डर्स, चेक्स, पट्टे आणि फुलांचे (बुट्टे) हे पारंपरिक डिझाईन आहेत. बदलता ट्रेंड लक्षात घेता, कांचीपुरम सिल्क साड्यांमध्येही परिवर्तन झाले आहे. कांचीपुरम डिझायनर सिल्क साड्यादेखील उपलब्ध आहेत, ज्यामध्ये पारंपरिक सिल्क साडीवर भरतकाम किंवा क्रिस्टलचे काम केले जाते. या साड्यांमधील नवीनतम ट्रेंडपैकी एक म्हणजे प्राचीन चित्रे आणि पल्लूमधील देव-देवतांच्या प्रतिमा वापरणे. साडीचा दर्जा आणि धाग्यांची डिझाईन यानुसार साडीची किंमत ठरते. तीन रेशमी धाग्यांची साडी चांदीच्या तारेने गुंफलेली असल्याने ती अधिक टिकाऊ बनते. एका कांजीवरमचे वजन २ किलो इतके असू शकते.

कांजीवरम साडी ओळखायची कशी?

कांजीवरम साडी घेताना तिचा पदर आधी तपासला पाहिजे. साडीपेक्षा जर पदर वजनाने जड असेल, तर ती खरी कांजीवरम साडी आहे. तसेही कांजीवरम साडी ही जडच असते. कारण तिच्यावर खूप जरीकाम असते. लाईटवेट कांजीवरम साडी नसते. कांजीवरम साडी घेताना त्या साडीवर नेहमी ‘सिल्क मार्क ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ यांनी दिलेला सिल्क मार्क सिम्बॉल आहे की नाही ते तपासून घ्यावे. यातून साडी अस्सल आहे की नाही, हे ओळखता येते.

कुठे आणि कशी तयार करतात?


जर तुम्ही तामिळनाडूला जाण्याचा विचार करत असाल, तर कांचीपुरम शहराला नक्की भेट द्या. येथील कांजीवरम साड्या उत्कृष्ट दर्जाच्या असतात. कांचीपुरमच्या प्रत्येक गावातील घराघरांमध्ये ही साडी तयार करणारे कारागीर असतात. कांजीवरम साड्या त्यांच्या गुणवत्तेमुळे आणि सुंदरतेमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. जरी त्या महाग असल्या, तरीही त्या साड्यांची डिझाईन आणि टिकाऊपणा किमतीपेक्षा खूप मौल्यवान आहेत.

GI टॅग आणि कांजीवरम साडीची ओळख :

कित्येकवेळा बाजारात कांजीवरम आणि कांचीपुरम बनावटी किंवा नकली साड्या विकल्या जातात. या साडीच्या खरेदीसाठी मोठी रक्कम मोजावी लागते. अशात फसवणूक होण्याची शक्यता असते. म्हणून कांजीवरम साडीला भारत सरकारने २००५-२००६ साली जियोग्राफिकल इंडिकेशन (GI) असा टॅग दिला आहे. त्यामुळे ही साडी खरी आहे की नाही, हे तपासणे सोपे झाले आहे.

महत्त्व :

जाड रेशमी आणि सोन्याच्या कापडाने विणलेल्या कांचीपुरम साड्या विशेष मानल्या जातात आणि त्या प्रसंगी आणि उत्सवांमध्ये परिधान केल्या जातात.

Recent Posts

Pune News : पुण्यातील गुन्हेगारीला बसणार चाप! पोलिसांचा मोठा निर्णय

पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…

49 seconds ago

Curd: दह्यासोबत या गोष्टी खाल्या तर, पोटात विष तयार होईल!

मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…

25 minutes ago

Mahesh Babu : तेलुगू सुपरस्टार महेश बाबूला मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीकडून समन्स

हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…

30 minutes ago

Earth Day : पृथ्वीचे वाढते तापमान पर्यावरणासाठी ठरतेय धोक्याची घंटा!

वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…

54 minutes ago

Delta Plane Catches Fire : ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, २८२ प्रवासी थोडक्यात बचावले

ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…

2 hours ago

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

2 hours ago