युवराज अवसरमल
महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातून पम्या नावाने लोकप्रिय झालेला कलावंत, प्रथमेश शिवलकरने आता साऱ्यांच्याच मनामध्ये लोकप्रियतेचा झेंडा फडकविला आहे. चिकी चिकी बुबूम बुम या मराठी चित्रपटाचे लेखन त्याने प्रसाद खांडेकर सोबत केलेले आहे व त्यात अभिनयदेखील केला आहे. प्रथमेशचे शालेय शिक्षण डोंबिवलीच्या रावी नेरुरकर माध्यमिक विद्यालयातून झाले. साने गुरुजी सेवा मंडळाच्या पांडुरंग विद्यालयात झाले. शाळेच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत मोरूची मावशीचा प्रवेश साकारला होता. त्यावेळी साडी नेसल्यामुळे स्टेजवर आल्यावर त्याला रडू आले होते. त्याच्या त्या धाडसाबद्दल बाईंनी त्याला बक्षीस दिले. त्यानंतर रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला. तेथे तो क्रिकेटची कॉमेन्ट्री करायचा. आंबेकर सरांनी त्याला सांस्कृतिक विभागात नेले, तेथे त्याला विद्यापीठाच्या एकांकिकेबद्दल माहिती दिली व एकांकिकेमध्ये काम करण्यासाठी विचारणा करण्यात आली. त्याने मित्रांसोबत स्कीट बसविले, अभिनय केला. त्याचे वडील व आजोबा नाट्यक्षेत्रातले होते.आजोबा आकाशवाणीत पार्ट टाईम म्हणून काम करायचे, तर वडील हौशी नाटकात काम करायचे. त्यानंतर त्याला अभिनय करणे आवडू लागले.
CM Devendra Fadnvis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २ मार्चला ‘परिवहन भवना’चे भुमिपुजन
कॉलेज संपल्यानंतर त्याने मुंबई गाठली. युथ फेस्टिवलची स्कीट बसविण्यासाठी तो मुंबईला आला होता. त्याच्या लिखाणाची कीर्ती प्रसिद्ध लेखक आशीष त. पाथरेंपर्यंत पोहोचली. त्यांनी त्यांच्यासोबत लिखाणासाठी सहाय्यक म्हणून त्याला घेतले. हा त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. कथा, पटकथा, संवाद कसे लिहायचे हे तो शिकला. आपल्या मनातील कागदावर कसं उतरवायचं हे तो शिकला. महाराष्ट्राची हास्यजत्रामधील लिखाण, अभिनयातून तो घरोघरी पोहोचला. प्रसाद खांडेकरने चिकी चिकी बुबूम बुम या चित्रपटाचे लेखन करण्यासाठी सहाय्य करण्यास त्याला बोलविले. ते करीत असतानाच त्याला या चित्रपटातील ‘आदी’ ही व्यक्तिरेखा साकारण्यास विचारण्यात आले.
असं म्हणतातं, एक दरवाजा बंद झाला, तर अनेक दरवाजे उघडले जातात, या चित्रपटाच्या बाबतीत म्हणालं, तर एक दरवाजा उघडण्यासाठी अनेक दरवाजे बंद केले जातात. रियुनियनच्या सेलिब्रेशनसाठी एकत्र जमलेल्या पण काही विचित्र गोष्टीमुळे कचाट्यात सापडलेल्या मित्रांची धमाल गोष्ट म्हणजे चिकी चिकी बुबूम बूम हा चित्रपट होय. या चित्रपटातील रियुनियनमधील कोणती ना कोणती व्यक्तिरेखा प्रेक्षकांशी जवळीक साधणारी आहे. प्रथमेशच्या व्यक्तिरेखेचे नाव आदी आहे. त्याचा स्वभाव भित्रा असतो. जेंव्हा काही करायची वेळ येते तेंव्हा त्याचा भित्रेपणा समोर येतो. रियुनियन तो अरेंज करतो, जेंव्हा काही घटना घडते तेंव्हा तो पळण्याचा प्रयत्न करतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद खांडेकरने केले आहे. सस्पेन्स ह्युमर प्रकारचा हा चित्रपट आहे. प्रसाद खांडेकरसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता असे विचारले असता प्रथमेश म्हणाला की, तो शांत स्वभावाचा आहे. त्याच्या सोबत काम करताना मजा आली. लेखण्याच्या वेळी अगदी मला फ्री हॅण्ड दिला होता. चिकी चिकी बुबूम बूम हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असा आशावाद त्याने व्यक्त केला.