Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीCM Devendra Fadnvis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २ मार्चला 'परिवहन...

CM Devendra Fadnvis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २ मार्चला ‘परिवहन भवना’चे भुमिपुजन

मुंबई : परिवहन विभागाचे (RTO ) मुख्यालय असलेल्या “परिवहन भवन” या नव्या इमारतीचे भूमिपूजन २ मार्च रोजी दुपारी २ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

https://prahaar.in/2025/03/01/deadline-for-admission-to-rte-25-reserved-seats-extended-till-march-10/

रस्ते वाहतुकीची नियमन करण्यासाठी १ मार्च १९४० ला तत्कालीन मुंबई राज्याचा परिवहन विभाग अस्तित्वात आला. त्यामुळे १ मार्च हा दिवस “परिवहन दिन” म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची औचित्य साधून या रविवारी सर पोचखानवाला मार्ग वरळी, मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते ४ मजली प्रशस्त अशा “परिवहन भवन” या इमारतीचे भूमिपूजन संपन्न होत आहे. सुमारे १२८०० चौरस मीटर बांधकाम क्षेत्र असलेल्या या इमारतीमध्ये एकावेळी १५० चारचाकी वाहने उभी करता येतील, इतकी चार मजल्याची भूमिगत पार्किंग व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. हि इमारत पुढील अडीच वर्षांत बांधून पूर्ण केली जाणार आहे.

विशेष म्हणजे राज्याला दरवर्षी १५ हजार कोटी रुपये महसूल मिळवून देणाऱ्या या विभागाच्या मुख्यालयाला स्वतः ची इमारत नव्हती. परिवहन विभाग स्थापन झाल्यापासून तब्बल गेली ८५ वर्ष या विभागाचे मुख्यालय भाड्याच्या इमारतीमध्ये होते. परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर परिवहन विभागाच्या पहिल्या बैठकीमध्ये परिवहन विभागाच्या मुख्यालयाची स्वतःची इमारत बांधण्याचा संकल्प सोडला. एवढंच नाही तर त्यांनी सातत्याने पाठपुरावा देखील केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते “परिवहन भवन” या परिवहन विभागाच्या मुख्यालयाचे येत्या रविवारी भुमिपुजन होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -