Saturday, April 19, 2025
Homeक्राईमलग्न ठरल्यानंतरही संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती; तरुणीला लग्नाचे आमिष देऊन पाच वर्ष अत्याचार!

लग्न ठरल्यानंतरही संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती; तरुणीला लग्नाचे आमिष देऊन पाच वर्ष अत्याचार!

जळगाव : गेल्या पाच वर्षांपासून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केले. नंतर लग्नास नकार दिला. त्यानंतर तिचे दुस-या मुलाशी लग्न ठरलेले असतानाही तिला शारिरीक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली. त्यास स्पष्ट नकार दिल्याने त्या तरुणाने तिच्या भावी पतीला याची माहिती दिल्याने तिचा विवाह देखील मोडला. हा धक्कादायक प्रकार चोपडा तालुक्यात उघडकीस आला असून याप्रकरणी तरुणीने तक्रार दिल्यावरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, चोपडा तालुक्यातील एका गावात २३ वर्षीय तरूणी राहायला असून तिचे पाच वर्षांपुर्वी संशयित आरोपी मनिष विजय पाटील रा. चोपडा याने प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला वेळोवेळी लग्नाचे आमिष देऊन अत्याचार केला. त्यानंतर त्याने तरूणीशी लग्न करण्यास नकार दिला. ही घटना घडल्यानंतर मात्र तरूणीने कोणतीही तक्रार केली नाही.

Naxalites Encounter छत्तीसगडच्या चकमकीत २ नक्षलवादी ठार

त्यानंतर मनीष याने लग्नास नकार दिल्याने पीडित तरुणीचा विवाह ठरला होता. दुसरीकडे तरूणीचे लग्न ठरलेले असताना देखील त्याने पिडीत तरूणीवर पुन्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यावर तरूणीने संबंध ठेवण्यास स्पष्ट नकार दिला म्हणून तिचे ठरलेले लग्न मोडण्यासाठी तिच्या भावी पतीला संशयित आरोपी मनीष पाटील याने बोलावून तिचे लग्न मोडले.

त्यामुळे या त्रासाला कंटाळून शेवटी पीडित तरुणीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिल्यावरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -