
नवी दिल्ली : ऐन होळी आणि ईदपूर्वी सरकारी कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ जाहीर केली आहे. इंडियन ऑईलने १ मार्चपासून १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ६ रुपयांची वाढ केली आहे, त्यामुळे दिल्लीत या सिलिंडरची किंमत १७९७ रुपयांवरून १८०३ रुपयावर पोहोचली आहे. दरम्यान घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमतीत कोणताही वाढ करण्यात येत नसल्याचं कंपन्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
सरकारी कंपन्यांकडून दर महिन्याच्या पहिल्या दिवशी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतला जातो. त्यानुसार या कंपन्यांनी आजपासून नव्या किंमती लागू केल्या आहेत. मात्र, हा सणासुदीचा महिना आहे. याच महिन्यात होळी आणि ईद हे सण आहेत. उद्यापासून रमजानचा महिना सुरु होतं आहे. याशिवाय अनेक लग्नकार्यही या महिन्यात पार पाडणार आहेत. त्यामुळे बाहेर रेस्टॉरंटमध्ये जेवण किंवा इतर पदार्थ महाग होण्याची शक्यता आहे.

मुंबई : परिवहन विभागाचे (RTO ) मुख्यालय असलेल्या "परिवहन भवन" या नव्या इमारतीचे भूमिपूजन २ मार्च रोजी दुपारी २ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ...
नव्या दरानुसार दिल्लीत १९ किलोच्या सिलिंडरची किंमत १७९७ वरून १८०३ रुपये करण्यात आली आहे. तर कोलकातामध्ये या सिलिंडरची १९०७ वरून १९१३ रुपये झाली आहे. मुंबईत व्यावसायिक सिलिंडरचे दर १७४९.५० वरून १७५५.५० रुपयांवर पोहोचले आहेत. तर चेन्नईमध्ये, व्यावसायिक सिलिंडरचे दर १९५९ वरून १९६५ रुपयांवर पोहोचले आहेत.