
छिंदवाडा : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात बर्ड फ्लूचा शिरकाव वाढत चालला आहे. रायगड व लातूरनंतर विदर्भ आणि मध्य प्रदेशातून बर्ड फ्लूच्या (Bird flu) धोक्याच्या पार्श्वभूमीवर एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात बर्ड फ्लूमुळे १८ मांजरींचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर विदर्भातून ६ हजारहून अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. बर्ड फ्लूच्या वाढत्या घटनेमुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले असून अलर्ट जारी केला आहे.

मुंबई : परिवहन विभागाचे (RTO ) मुख्यालय असलेल्या "परिवहन भवन" या नव्या इमारतीचे भूमिपूजन २ मार्च रोजी दुपारी २ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ...
१८ पाळीव मांजरांचा मृत्यू
मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत १८ पाळीव मांजरांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर CMHO ने तात्काळ एक विशेष टीम तयार केली. तसेच बर्ड फ्लूच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नियंत्रणासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. (Bird Flu)
विदर्भात ६ हजार ८३१ कोंबड्यांचा मृत्यू
विदर्भात बर्ड फ्लूने थैमान घातले आहे. २० ते २७ फेब्रुवारीदरम्यान वाशिमच्या कारंजा तालुक्यातील खेर्डा जिरापुरे येथील एका पोल्ट्री फार्ममधील ८ हजार कोंबड्यांपैकी ६ हजार ८३१ कोंबड्यांचा मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर अकोला येथील प्रयोगशाळेकडून येथील मृत पक्ष्यांचे नमुने संकलित करून ते तपासणीसाठी पुणे येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद-राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थानकडे पाठविले. तेथून हे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. या प्रयोगशाळेच्या तपासणीत कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे निष्पन्न झाले.
मटण आणि चिकन दुकाने सील
बर्ड फ्लूचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने तात्काळ अलर्ट जारी करत मांस, चिकन आणि अंडी खरेदी-विक्रीवर ३० दिवसांसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, बर्ड फ्लूच्या प्रभावी क्षेत्रांमधील सर्व मटण आणि चिकन दुकाने सील करण्यात आली आहेत. या उपाययोजनांमुळे रोगाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येत असून नागरिकांना सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सूचना देण्यात येत आहेत. (Bird Flu)