एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांच्या शोधात पोलीस ‘एमपी’ पर्यंत पोहचले
अमरावती : तिवसा शहरात महामार्गावर असलेले एटीएम फोडून ४ लाख ८० हजारांची रोख लंपास केली. त्यानंतर चोरट्यांनी (ATM robbers) एटीएम जाळून टाकले. या चोरट्यांच्या शोधासाठी ग्रामीण पोलिसांचे पाच पथक कार्यरत आहे. या पथकांनी आतापर्यंत सुमारे ७० ते ८० ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. यामधून चोरट्यांनी पांढऱ्या रंगाची कार वापरल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून, चोरटे मध्य प्रदेश मार्गे समोर पळाल्याचा संशय आहे. त्यामुळे ग्रामीण पोलीस तिसऱ्या दिवशी मध्य प्रदेशापर्यंत पोहोचले आहेत.
चोरट्यांनी वापरलेली संशयित कार वरूड मार्गे मध्य प्रदेशात पोहोचल्याचा अंदाज
ग्रामीण पोलिसांच्या पथकाने (ATM robbers) वरुड, नागपूर या दोन्ही मार्गे असलेले सीसीटीव्ही तपासले आहेत. चोरट्यांनी वापरलेली संशयित कार वरूड मार्गे मध्य प्रदेशात पोहोचल्याचा अंदाज आहे. त्याच आधारे गुरुवारी (दि. २७) एलसीबीचे दोन पथक मध्य प्रदेशात पोहोचले आहे. बैतुलमध्येही एका ठिकाणी कार सीसीटीव्हीत दिसली मात्र कोणत्याही सीसीटीव्हीमध्ये कारचा क्रमांक कैद झाला नाही. त्यामुळे कार कुठली आहे किंवा चोरटे कुठले आहेत, याबाबत ठोस माहिती पोलिसांना अद्याप प्राप्त झाली नाही.
CM Devendra Fadnvis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २ मार्चला ‘परिवहन भवना’चे भुमिपुजन
मागील वर्षीही तिवसा येथील हेच एटीएम चोरट्यांनी फोडले होते
दरम्यान मागील वर्षीही तिवसा येथील हेच एटीएम चोरट्यांनी (ATM robbers) फोडले होते. ते चोरटेही वरुड, मध्य प्रदेश मार्गेच हरियाणाला गेले होते. ते चोरटे हरियाणाचे होते. मात्र त्या टोळीतील एकच चोरटा आणि चोरट्यांनी गुन्हा करतेवेळी वापरलेल्या कारचा मालक असे दोघेच पोलिसांच्या हाती आले होते. पुन्हा त्याच भागातील चोरट्यांनी ही चोरी केली आहे का, याबाबत पोलीस तपास करत आहेत.