आग्रा : आई वडील आणि लाडक्या अक्कूची माफी मागत, पुरुषांच्या संरक्षणासाठी कायदा हवा अशी मागणी करत; टीसीएसच्या मॅनेजरने आत्महत्या केली. पंख्याच्या मदतीने त्याने गळफास घेतला. आत्महत्या करण्याआधी मानव शर्माने सुमारे सात मिनिटांचा एक व्हिडीओ केला. या व्हिडीओद्वारे स्वतःची बाजू मांडून मानवने टोकाचे पाऊल उचलले.
View this post on Instagram
Alibaug Boat Fire : अलिबागच्या समुद्रात मच्छीमारांच्या बोटीला आग
मूळचा उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे राहणारा मानव नोकरीच्या निमित्ताने मुंबईत वास्तव्यास होता. तो टीसीएसमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत होता. नोकरीत स्थिरस्थावर होता म्हणून त्याने लग्नाचा निर्णय घेतला. त्याचे ३० जानेवारी २०२४ रोजी लग्न झाले. लग्नानंतर तो आणि त्याची पत्नी मुंबईत वास्तव्यास होते. मुंबईत पती – पत्नीचे वारंवार वाद होऊ लागले. पत्नी मानवला आणि त्याच्या घरच्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याची धमकी देत होती. वारंवार बॉयफ्रेंड सोबत राहण्याची भाषा करू लागली होती. अखेर मानव सुटी घेऊन पत्नीसह आग्रा येथे आला. ज्या दिवशी घरी आला त्याच दिवशी थोड्या वेळाने तो पत्नीला माहेरी सोडण्यासाठी गेला. मानवने पत्नीला २३ फेब्रुवारी रोजी माहेर सोडले. यानंतर २४ फेब्रुवारी रोजी मानवने आत्महत्या केली.
Chinchpokli Fire : चिंचपोकळीत अग्नितांडव! निर्मल पार्क इमारतीला भीषण आग
मुलाने आत्महत्या केल्याचे समजल्यापासून वायुदलातून निवृत्त झालेल्या त्याच्या वडिलांना जबर धक्का बसला आहे. पत्नीच्या जाचाला वैतागून माझ्या मुलाने, मानव शर्माने आत्महत्या केली; असे त्याचे वडील नरेंद्र शर्मा म्हणाले. मला न्याय हवा आहे, अशी मागणी त्यांनी केली.
दत्तात्रय गाडेला फासावर लटकावण्यासाठी पाठपुरावा करणार, रुपाली चाकणकरांनी दिले संकेत