Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीधुळे : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धुळ्याचे सीईओ विशाल नरवाडे यांचा गौरव

धुळे : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धुळ्याचे सीईओ विशाल नरवाडे यांचा गौरव

धुळे : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या संकल्पनेनुसार राज्यात १०० दिवसांचा कृति आराखडा तयार करण्यात आला आहे. या १०० दिवस कृती आराखड्याची धुळे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी या आराखड्यातंर्गत राबविलेल्या विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांबद्दल ते राज्यातील उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी ठरले असून याबद्दल त्यांचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार राज्यात राबविण्यात येत असलेल्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी राज्यातील १५ विविध विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय, महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदांमध्ये या आराखड्यातंर्गत सुरु असलेल्या उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषद गटात सादरीकरणाची संधी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी मिळाली. नरवाडे यांनी केलेल्या कामकाजाचे उत्कृष्ट सादरीकरण केल्याने ते राजयातील उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी ठरले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

Pune News : पुणेकरांचे आरोग्य धोक्यात! रेशनच्या दुकानांमध्ये सिमेंट मिश्रित तांदळाची विक्री

या सादरीकरणात राज्य शासनाने ठरवून दिलेल्या सात कलमी कार्यक्रमाबरोबरच विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण नरवाडे यांनी केले. जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ तयार करण्यात धुळे जिल्हा परिषद राज्यात चौथ्या तर नाशिक विभागात प्रथम क्रमांकावर आहे. यामुळे ग्रामविकास विभागाच्या ७ सेवा ऑनलाईन प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. सुकर जीवनमान अतंर्गत सेवांचीर पोहोच सुनिश्चित करण्यासाठी आणि ग्रामीण भागात राहणीमान सुलभ करण्यासाठी ९ उपक्रम राबविण्यात येत आहे. कार्यालयीन स्वच्छता उपक्रमातंर्गत स्वच्छतेची पंचसुत्री तयार करण्यात येऊन जुन्या निरुपयोगी वस्तुंची विल्हेवाट लावण्यात आली आहे. तक्रार निवारण उपक्रमातंर्गत आपले सरकार पोर्टलवरील ३४९ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.

अभ्यागत भेटीचे नियोजन, नागरीकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचबरोबर कार्यालयीन सोईसुविधा उपक्रमातंर्गत कार्यालयाच्या आवारात स्वच्छ पिणयचे पाणी, स्वच्छ प्रसाधनगृह, सुसज्ज प्रतिक्षालय, प्रथमोपचार पेटी, दिव्यांग अभ्यागतांसाठी व्हीलचेअर, कार्यालयाचे सौंर्दयीकरण करण्यात आले आहे. क्षेत्रीय कार्यालयांना भेटी उपक्रमातंर्गत आठवड्यातून किमान २ दिवस क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देऊन पाहणी करण्यात येत आहे. प्रशासकीय कामकाजात १ जानेवारीपासून ई-ऑफिस प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. यामुळे कामकाजास गती आली आहे. आर्थिक व औद्योगिक गुंतवणूकीस प्रोत्साहन उपक्रमातंर्गत उद्योगांना पोषक वातावरण तयार करण्यात येत आहे. त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या, नोंदणी, कर भरण्याची सुलभता पध्दत सोपी करण्यात आली आहे. अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण, सेवा विषयक बाबी व कृत्रिम बुध्दीमत्ता व तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात आला आहे.

याशिवाय नाविण्यपूर्ण उपक्रमात घरकुल लाभार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याने काम पूर्णत्वास गती आली आहे. शिवाय कॉपी मुक्त अभियानाचा धुळे पॅटर्न राज्यभरात नावारुपास येत असून या उपक्रमाचे शिक्षणमंत्री, मुख्य सचिव तसेच शिक्षण आयुक्त यांनीही कौतुक केले आहे.या विविध उपक्रमांसोबतच पुढील उर्वरित दिवसांचे उत्कृष्ट नियोजन आदिंचे अतिशय उत्कृष्ट सादरीकरण नरवाडे यांनी सादर केल्याने ते उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी ठरले आहे. याबद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनीही त्यांचे कौतुक केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -