अलिबाग एसटी आगाराबाहेर दोन एसटीचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू, दुचाकी आणि रिक्षाला चिरडले!

नातेवाईकांनी फोडल्या बसच्या काचा


अलिबाग : अलिबाग एसटी स्थानकाच्या बाहेर (Alibaug ST depo) राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका दुचाकीस्वाराला आपले प्राण गमवावे लागल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी घटनास्थळी जोरदार राडा घातला.



दोन बसचा भीषण अपघात


मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग एसटी आगाराबाहेर दोन बसचा भीषण अपघात झाला. या बसच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी अपघातामध्ये मृत झालेल्या व्यक्तीचे नाव जयदीप बना असे आहे. या घटनेनंतर मृत्यू व्यक्तीच्या संतप्त नातेवाईकांनी अपघातग्रस्त एसटीच्या काचा फोडल्या. तसेच काही वेळ मयताच्या नातेवाईकांनी एसटी बस रोखून धरली होती. यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.



दोन बसच्यामध्ये तरुण मोटार सायकलसह अडकल्याने त्याचा जागीच मृत्यू


अलिबाग एसटी आगाराबाहेर या दोन्ही एसटी बसची झालेली धडक इतकी जोरदार होती की, सदर अपघातात एका रिक्षेचेही नुकसान झाले आहे. दोन्ही बसेस अलिबाग बस स्थानकात शिरत असताना हा अपघात झाला. या दोन बसच्यामध्ये तरुण मोटार सायकलसह अडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.



यामुळे अलिबाग एसटी आगाराबाहेर मोठा जमाव तयार झाला होता. या अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांना जमावाला पांगवताना मोठी कसरत करावी लागली. या ठिकाणी पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

कोलेस्टेरॉलचा वाढणारा धोका टाळा, शरीर आणि त्वचेवर होणारे बदल वेळीच ओळखा...

सध्याच्या वेगवान जीवनशैलीत सगळेच जण अरबटचरबट खात असतात. या सवयीमुळे शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढत चालेल आहे.

LG Listing Today: LG Electronics IPO चे आज अखेर लिस्टिंग ५०% प्रिमियमसह गुंतवणूकदारांची ताबडतोड कमाई

मोहित सोमण : आज अखेर एलजी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे दणक्यात लिस्टिंग झाले आहे. तब्बल ५०% प्रिमियम दरासह एलजी शेअर

सकाळच्या सत्रात शेअर बाजाराचे कमबॅक फार्मातील घसरण आयटी, फायनांशियल सर्विसेसने भरून काढली

मोहित सोमण : आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ झाली आहे. दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज पहाटे

महाराष्ट्रात मंकी पॉक्सचा शिरकाव; धुळ्यात आढळला पहिला रुग्ण

धुळे : जगभरात थैमान घालणाऱ्या मंकी पॉक्सचा राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यात आढळून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच

मध्य रेल्वे पुन्हा उशिराने, लोकल अर्धा तास लेट, कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचा खोळंबा

मुंबई: मुंबईची 'लाइफलाइन' मानली जाणारी लोकल सेवा, विशेषत: मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. आज

खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार ६ लाख रुपयांची भरपाई, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई: रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाती मृत्यूंच्या वाढत्या घटनांवर मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत