प्रयागराज : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे तब्बल ४५ दिवसांपासून सुरू असलेल्या महाकुंभाचा बुधवारी (२६ फेब्रुवारी) समारोप झाला. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दोन्ही उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि केशव प्रसाद मौर्य, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आज, गुरुवारी त्रिवेणी संगमावर पोहोचले. योगी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अरैल घाटावर स्वच्छता केली. सर्वांनी गंगेतील कचरा बाहेर काढला. गंगेची पूजा केली. तसेच गंगा पंडालमध्ये पोलिस, स्वच्छता कामगार आणि नाविकांचा सन्मान केला.
योगी आणि इतर मंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आजही अनेक रस्ते बॅरिकेडिंग केले आहेत. जत्रेच्या परिसरातील पार्किंगमध्ये वाहने पार्क करण्यात आली होती. महाकुंभाचे शेवटचे स्नान बुधवारी महाशिवरात्रीला झाले. गेल्या १३ जानेवारीपासून ते २६ फेब्रुवारीदरम्यान संपूर्ण महाकुंभात ६६ कोटी भाविकांनी स्नान केले.
अखेर महाकुंभमेळ्याची सांगता, तब्बल ६५ कोटी भाविकांनी पवित्र स्नान करत रचला इतिहास
हा आकडा अमेरिकेच्या लोकसंख्येच्या (सुमारे ३४ कोटी) दुप्पट आहे. संगमात स्नान करणाऱ्यांची ही संख्या १९३ देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. महाकुंभाला येणाऱ्या भाविकांच्या संख्येपेक्षा फक्त भारत आणि चीनची लोकसंख्या जास्त आहे. योगी सरकारने दावा केला की जगातील निम्म्या हिंदू लोकसंख्येइतके लोक येथे आले आहेत.