Monday, May 19, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

MNS Book Exhibition : शिवाजी पार्कवर मनसेचे आज भव्य पुस्तक प्रदर्शन!

MNS Book Exhibition : शिवाजी पार्कवर मनसेचे आज भव्य पुस्तक प्रदर्शन!

मराठी भाषा दिनी दिग्गजांचे रंगणार काव्यवाचन


मुंबई : ज्ञानकोषाचे भांडार असलेल्या मराठी भाषेतील अफाट साहित्यांच्या भव्य पुस्तकांचे प्रदर्शन शिवाजी पार्क (Shivaji Parl) येथे मनसेच्या वतीने भरविण्यात येणार असून दिग्गजाचे कविता वाचन होणार आहे. (MNS Book Exhibition)



मनसेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज सायंकाळी ६ वाजता शिवाजी पार्क येथे पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात येणार असून वाचकांना ही पुस्तके पर्वणीच ठरणार आहेत. यावेळी ज्येष्ठ गायिका आशा भोसले, सिनेअभिनेता विकी कौशल, रितेश देशमुख, सोनाली बेंद्रे, आशुतोष गोवारीकर, अभिजित जोशी, शर्वरी वाघ, नागराज मंजुळे, विजय दर्डा, भरत दाभोळकर, गिरीश कुबेर, पराग करंदीकर, राजीव खांडेकर, महेश मांजरेकर, लक्ष्मण उतेकर आदी दिग्गज मान्यवर तसेच स्वतः राज ठाकरे आपल्या आवडीची कविता वाचन करणार आहेत.


नामांकित प्रकाशकांची १०५ स्टॉल्स पुस्तके या प्रदर्शनात मांडण्यात येणार असून हे पुस्तक प्रदर्शन गुरुवार दिनांक २७ ते २ मार्च या कालावधीत ते वाचक प्रेमिना चाळायला मिळतील. सकाळी ११ ते रात्री ९ प्रदर्शन चालू राहील.


आदान प्रदान या अंतर्गत घरातील जुने पुस्तक आणि दहा रुपये देऊन कोणतेही पुस्तक वाचकांना कोणतेही मूल्य न देता घेता येणार आहे.अनेक शाळकरी तसेच महाविद्यालयीन विध्यार्थी तसेच लाखो पुस्तक प्रेमी प्रदर्शन पाहायला येतील असे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय येवल्याचे कापसे आणि सोनीची पैठणी कशी विनली जाते हे देखील पाहायला मिळणार आहेत. तर प्रशांत कॉर्नरची खाद्यपदार्थांचे स्टॉल्सदेखील याठिकाणी लावण्यात येणार असल्याचे मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी सांगितले. (MNS Book Exhibition)

Comments
Add Comment