प्रसिद्ध अभिनेत्रीचे ३९ व्या वर्षी निधन

न्यूयॉर्क : हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मिशेल ट्रॅचटेनबर्गचा मृतदेह एका आलिशान अपार्टमेंटमध्ये आढळला. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. अभिनेत्रीच्या मृत्यूचे कारण अद्याप समजलेले नाही. बालकलाकार म्हणून मनोरंजनसृष्टीत पदार्पण करणारी मिशेल ट्रॅचटेनबर्ग पुढे चित्रपट आणि टीव्ही जगतात एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून नावारुपाला आली.



मिशेल न्यू यॉर्कमधील सेंट्रल पार्क साउथ येथील वन कोलंबस प्लेस येथील तिच्या आलिशान अपार्टमेंटमध्ये राहत होती. याच अपार्टमेंटमध्ये मिशेल ट्रॅचटेनबर्गचा मृतदेह आढळला. मिशेलच्या आकस्मिक निधनाने तिच्या नातलगांना आणि चाहत्यांना धक्का बसला आहे.

बालपणी मिशेलने एका टीव्ही जाहिरातीतून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर १९९० ते २००० च्या दशकात ती इंग्रजी चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांमधून झळकत राहिली. ‘युरोट्रिप’, ‘आइस प्रिन्सेस’, ‘किलिंग केनेडी’ आणि ‘सिस्टर सिटीज’ हे मिशेलचे निवडक गाजलेले चित्रपट होते. मिशेलने नंतर ‘गॉसिप गर्ल’मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. या प्रसिद्ध अभिनेत्रीने २०२१ मध्ये मीट, मॅरी, मर्डर ऑन टुबी या गुन्हेगारी घटनांवर आधारित माहितीपटांसाठी होस्ट म्हणून काम केले होते.
Comments
Add Comment

‘दशावतार’ची छप्पर फाड कमाई !

मुंबई : सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात उत्तम कामे केली. या चित्रपटाने सहाव्या

कपिल शोच्या ग्रँड फिनालेत अक्षय कुमारचा जलवा !

मुंबई : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनचा समारोप अतिशय धमाल आणि भावनिक क्षणांनी झाला . या भागाचे

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'जॉली एलएलबी ३' च्या निर्मात्याला दिलासा !

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाविरोधात दाखल

पीएम मोदी बायोपिकची घोषणा

साऊथ स्टार उन्नी मुकुंदन होणार 'पंतप्रधान' मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आणखी एक बायोपिक

Dashavtar Box Office Collection: दशावतारच्या कमाईत होतेय जबरदस्त वाढ, कमावले तब्बल इतके कोटी...

मुंबई: बॉलिवूडपासून ते दाक्षिणात्य सिनेमांपर्यंत सर्वांवर सध्या मराठी सिनेमा दशावतार भारी पडत आहे. दिवसेंदिवस

अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर

मुंबई: अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये