नवी मुंबई : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Navi Mumbai Airport) काम जवळपास पूर्ण झाले असून लवकरच हे विमानतळ प्रवाशांसाठी सज्ज होणार आहे. सोमवारी संयुक्त पथकाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी केली असून विमानतळ उद्घाटनाची तारीख देखील जारी केली आहे.
Ratnagiri : मराठी भाषा गौरव दिन समारंभाला पालकमंत्र्यांची उपस्थिती
DGCA च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “मूल्यांकनादरम्यान, आम्हाला विमानतळ ऑपरेटरने कळवले की ते ५ मार्चपर्यंत सर्व आवश्यक असणारी परवानगी मिळविण्यासाठी अर्ज करतील”. या सर्व तपासणीनंतर, आता विमानतळ ऑपरेटर नियमांनुसार विमानतळ परवान्यासाठी DGCA कडे अर्ज करतील. हे अर्ज १५ मे पासून सुरू होणाऱ्या फ्लाइट ऑपरेशनसाठी असणार आहे. त्यानंतर १५ मे पासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा प्रवाशांसाठी सुरु होणार आहे.
दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच सुरु होणार असल्यामुळे नवी मुंबईमध्ये राहणाऱ्या रहिवाश्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु झाल्यावर अनेक रिक्षा चालकांना रोजगाराची सुविधादेखील मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Navi Mumbai Airport)
काय आहेत वैशिष्टये?
नवी मुंबई विमानसेवा कार्यान्वित झाल्यानंतर दरवर्षी ९० दशलक्ष प्रवासी हाताळेल अशी अपेक्षा आहे. सध्या ३.७ किमी धावपट्टी ऑपरेशनसाठी तयार आहे, लवकरच दुसरी धावपट्टी बांधण्याची योजना आहे. त्याचबरोबर भूमिगत मेट्रो द्रुतगती मार्ग, अटल सेतू पूल, बुलेट ट्रेन सेवा या बहुविध वाहतूक पर्यायांमुळे विमानतळ प्रवेशयोग्य होईल आणि प्रवाशांचा प्रवास वेळ देखील कमी होणार आहे.