रत्नागिरी : मराठी भाषा गौरव दिन व कवी कुसुमाग्रज जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमाला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत उपस्थित होते.
यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीमधील शिरगाव येथे स्थानबद्ध असलेल्या घटनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या आठवणींना श्री. सामंत यांनी उजाळा दिला. सावरकर ज्या दामले कुटुंबीयांकडे राहत होते, त्या सर्व दामले कुटुंबीयांचा या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
स्वारगेट प्रकरणातील आरोपीची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे पारितोषिक
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम दरवर्षी राज्य शासनाच्या वतीने साजरा केला जाईल. तसेच राज्याचा मराठी भाषा मंत्री म्हणून मला मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे भाग्य लाभले, यासाठी मी रत्नागिरीकरांचा ऋणी आहे, असे श्री. सामंत यांनी सांगितले.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रांताधिकारी जीवन देसाई, मुख्याधिकारी तुषार बाबर, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, गजानन पाटील, आनंद शेलार, निमेश नायर आणि सर्व माजी नगरसेवक तसेच मोठ्या संख्येने रत्नागिरीकर उपस्थित होते.