
View this post on Instagram

प्रसिद्ध अभिनेत्रीचे ३९ व्या वर्षी निधन
न्यूयॉर्क : हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मिशेल ट्रॅचटेनबर्गचा मृतदेह एका आलिशान अपार्टमेंटमध्ये आढळला. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. ...
'छावा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला त्यावेळी त्यात छत्रपती संभाजी महाराज आणि पत्नीसह लेझीम नृत्य करत असल्याचे एक दृश्य होते. या दृश्यावरुन आक्षेप घेण्यात आले. अखेर नागरिकांच्या भावनांचा मान राखत चित्रपटातून वादाचे कारण ठरलेले लेझीम नृ्त्य काढण्यात आले. यानंतर प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या उत्साहवर्धक वातावरणात अचानक 'छावा' चित्रपटातील राजमाता सोयराबाईंच्या एका डिलीटेड सीनची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

घटस्फोट घेणार असल्याच्या वृत्तावर काय म्हणाला बॉलिवूड अभिनेता गोविंदा ?
मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा अरुण आहुजा घटस्फोट घेणार असल्याचे वृत्त आहे. गोविंदा आणि सुनिताच्या लग्नाला ३७ वर्षे झाल्यानंतर गोविंदाने घटस्फोट ...
राजमाता सोयराबाई आणि हंबीरराव मोहिते यांच्यात एक संवाद होताना दिसत आहे. अभिनेता आशुतोष राणा हा हंबीरराव मोहिते यांच्या भूमिकेत आहे तर अभिनेत्री दिव्या दत्ता राजमाता सोयराबाई यांच्या भूमिकेत आहे. छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या मुलाला म्हणजेच अकबरला भेटल्यानंतरचे हे दृश्य आहे. यात हंबीरराव हे सोयराबाईंना स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानांची आठवण करुन देतात. यानंतर ते सोयराबाईंच्या उद्दिष्टांबाबत प्रश्न उपस्थित करतात. हा संवाद मनाचा ठाव घेतो. याच कारणामुळे हा सीन व्हायरल होत आहे. सोशल मीडियात या सीनची चर्चा सुरू आहे. दमदार अभिनय, अप्रतिम संवाद... असे असूनही हा संवाद चित्रपटातून का वगळला ? असा प्रश्न अनेकजण उपस्थित करत आहेत.